कोकण

मुलांच्या मौखिक आरोग्याकडे पालकांनी लक्ष द्यावे

CD

- rat७p१३.jpg-
२५N३६९२९
चिपळूण ः शिबिरात विद्यार्थ्यांची दंत तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी.

मुलांच्या मौखिक आरोग्याकडे पालकांनी लक्ष द्यावे

डॉ. सतीश गवाळे ः आदर्श विद्यामंदिर चिवेली येथे दंत चिकित्सा शिबिर

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः शालेय स्तरावरती विद्यार्थ्यांची वेळोवेळी मौखिक आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. आरोग्याच्या इतर समस्यांबरोबरच मौखिक आरोग्यही निरोगी ठेवणे विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महत्वपूर्ण आहे. दातांना कीड लागणे किंवा हिरड्यातून रक्त येणे या समस्या ज्यामुळे उद्भवतात त्या गोष्टींचे आकलन करून दूर करण्यासाठी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे मत कामथे उपजिल्हा रुग्णालयातील दंत चिकित्सक डॉ. सतीश गवाळे यांनी व्यक्त केले.
चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचालित आदर्श विद्यामंदिर चिवेली येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून दंत चिकित्सा शिबिर आयोजित केले होते. या वेळी आदर्श विद्यामंदिर चिवेलीचे चेअरमन संतोष कुळे, शाखा समिती अध्यक्ष सुभाष शिर्के, मुख्याध्यापक संजय चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयातील प्रीतम कारंडे, स्वाती वाघमारे, शिंदे उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. गवाळे म्हणाले, मुलांचे आरोग्य निरोगी ठेवणे गरजेचे आहे. शालेय स्तरावर मुलांना काही खाण्याची सवय असते. जंकफूड्स, चिकट, गोड पदार्थ मुले आवडीने खात असतात. ते तोंडाची काळजी घेत नाहीत. अशावेळी दातांना कीड लागण्याचा संभव असतो. तोंडाला वास येणे आणि तोंड येणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे सकाळी व रात्री दोनदा ब्रश करणे महत्वाचे आहे. दर सहा महिन्यांनी दातांची नियमित तपासणी डॉक्टरांकडून करून घेतल्यास निश्चितच दातांच्या समस्यांपासून सुटकारा मिळेल. लहान मुलांचे दात तोंडात उगवल्यानंतर ते साधारण पाच वर्षापर्यंत मुलांचे दात घासण्याकडे पालकांनी लक्ष द्यावे. त्यांना भरपूर प्रमाणात फळे, तंतूमय पदार्थ आणि भाज्या खायला दिल्या पाहिजेत. तीन महिन्यानंतर टूथब्रश बदलले पाहिजे, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या.
---
३३ विद्यार्थ्यांना दाताच्या समस्या
विद्यामंदिरमध्ये झालेल्या शिबिरात पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३३ विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दाताच्या समस्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील डॉ. सतीश गवाळे व प्रीतम कारंडे यांनी तपासणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT