- rat७p४.jpg -
KOP२५N३६९२२
साडवली ः मार्लेश्वर यात्रेविषयी आयोजित आढावा बैठकिला उपस्थित विविध विभागांचे अधिकारी.
मार्लेश्वरात येणाऱ्यांची काळजी घ्या
अमृता साबळे ः यात्रोत्सवापुर्वी देवरूखात आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ७ ः मार्लेश्वर यात्रेला येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची विशेष खबरदारी घ्या, अशा सुचना तहसिलदार अमृता साबळे यांनी सर्व विभागांना दिल्या.
अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हे स्वयंभू देवस्थान आहे. यावर्षी श्री देव मार्लेश्वराचा यात्रोत्सव १३ आणि १४ जानेवारीला मकर संक्रातीला होणार असून, त्याच अनुषंगाने संगमेश्वर तालुक्याच्या तहसीलदार अमृता साबळे यांनी आज ६ जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली. संगमेश्वर तालुक्यातील सर्वांसाठीच हे देवस्थान प्रार्थनीय आहेच, असे त्यांनी या वेळी उपस्थित सर्वांना संबोधित केले व सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. या बैठकीला निवासी नायब तहसीलदार सुरेश गोताड, देवरूख पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मुजावर आणि त्यांचे सहकारी मावळंकर, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, महावितरणचे गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, एसटी विभाग आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.