rat७p१९.jpg
२५N३६९४०
ः तुळशी ः आजची स्त्री खरंच सुरक्षित आहे का? या विषयी संदेश देणारी रांगोळी.
rat७p२१.jpg ः
P२५N३६९४२
सांस्कृतिक कलाविष्कार सादर करताना विद्यार्थी.
रांगोळीतून स्त्री सुरक्षिततेवर भाष्य
न्यू इंग्लिश स्कूल तुळशी; कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ : न्यू इंग्लिश स्कूल तुळशी या शाळेच्या वार्षिक स्नेसंमेलनात रांगोळी प्रदर्शनातून स्त्री सुरक्षितता, बेटी बचाव संदेश दिला. तसेच विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाविष्कारात रसिक मंत्रमुग्ध झाले. या वेळी यशवंत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिसून आली.
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ४ जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले. या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत सामाजिक विषयात आजची स्त्री खरंच सुरक्षित आहे का? याचा संदेश देणारी संबोधी पवार, खुशी मुंढे यांच्या रांगोळीला प्रथम क्रमांक मिळाला. जागतिक महिलादिनाचे महत्व सांगणाऱ्या समृद्धी चव्हाण, तनिष्का पारदुळे व माझे संविधान माझा अभिमान, संविधानाचा जागर संदेश देणाऱ्या नेहा सागवेकर, श्रावणी कुळे, अमृता निवेंडकर द्वितीय क्रमांक, मुलगी शिकली प्रगती झाली हा संदेश देणाऱ्या सिद्धी चव्हाण, श्रावणी शिंदे, आदिती चाचले यांना तृतीय क्रमांक देण्यात आला तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश संपन्न केलेल्या श्रावणी कुळे, जय पेंढारी-प्रश्नमंजुषा, शिक्षक शिवाजी सोनवणे-शिक्षक प्रतिकृती द्वितीय क्रमांक, रामकृष्ण धाडवे विद्यार्थी प्रतिकृती उत्तेजनार्थ, क्रीडा स्पर्धेत थाळीफेक व गोळाफेक प्रकारात यश संपादन केलेल्या तन्मय मोगरे, ५ किमी चालणे सोहेल वणे, आयुष दुर्गवले यांचा सत्कार करण्यात आला. शाळेसाठी देणगी देणाऱ्या शिक्षणप्रेमी देणगीदारांचे आभार मानण्यात आले. सांस्कृतिक कलाविष्कार गणेश आराधना, शेतकरी गीत, देशभक्ती गीत, कोळीनृत्य, नाटिका तसेच विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मुख्याध्यापिका श्रद्धा नटे, रामअण्णा शेडगे, रामचंद्र पारधी, संजय शेडगे, सुवर्णा धाडवे, संतोष पोस्टुरे, दिनेश चव्हाण, संजय शिगवण, शिक्षक शिवाजी सोनवणे, खंदारे, कोतवाल, कैलास धाडवे व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.