swt72.jpg
36965
सावंतवाडीः अॅबॅकस स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षक.
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे
राज्यस्तर अॅबॅकस स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः कोल्हापूर येथे गुरुश्री अकादमीतर्फे झालेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे १९ विद्यार्थी सहभागी झाले. पैकी सहावीतील हेरंब नाटेकर व पाचवीतील माझ पटेल यांनी प्रथम श्रेणी पटकावली.
दुसरीमधील नैतिक जाधव, तिसरीतील पवित्र शिंदे व सहावीतील विहान राणे यांनी तृतीय श्रेणी पटकावली. पहिलीमधून अर्जुन भिसे, पाचवीतील प्रत्युषा घोगळे, रेहान सारंग, निशांत पठाण, अद्वैत पाथरवट, सहातीतील शार्दुल धारगळकर यांनी अनुक्रमे चौथी श्रेणी प्राप्त केली. सहावीतील वैष्णव सावंत व हिना सारंग यांनी पाचवी श्रेणी, पहिलीतील मिहिरा खटावकर, नित्या धुरी, दुसरीतील तनिश भिसे, तिसरीमधील अंश मासंग, पाचवीतील किमया पोटे, सहावीतील विजय सावळ यांनी उत्तेजनार्थ श्रेणी प्राप्त केली. या सर्व विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना गुरुश्री अॅबॅकस अकादमीच्या शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अॅड. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.