कोकण

बांदा येथे आज आरोग्य चिकित्सा

CD

बांदा येथे आज
आरोग्य चिकित्सा
बांदाः महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिन व सप्ताह अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल व बांदा पोलिस ठाणे यांच्यावतीने मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन उद्या (ता. ८) सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत केले आहे. शिबिर विठ्ठल मंदिर सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. या शिबिरात महिला व पुरुष यांची मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. लाईफ टाईम हॉस्पिटल व एसएसपीएम मेडिकल कॉलेज पडवे येथील एमडी (मेडिसिन), स्त्रीरोगतज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ, नेत्रचिकित्सक आदी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तपासणीनंतर रुग्णांना औषधे मोफत देण्यात येणार आहेत. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सहकार्याने याचठिकाणी रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी, नागरिकांनी, तरुण मंडळे यांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी केले आहे.
....
वेंगुर्ले शाळा क्र. १ चे
आज बक्षीस वितरण
वेंगुर्लेः शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेंगुर्ले नं. १ चे वर्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उद्या (ता. ८) आयोजित केले आहे. वार्षिक बक्षीस वितरण समारंभ व बालचमूंचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता, बक्षीस वितरण विठाई सभागृहात ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम (अण्णा) नाईक यांच्या अध्यक्षेखाली होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, वेंगुर्ले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, ‘कलावलय’ संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, उद्योजक तथा माजी नगरसेवक उमेश येरम, वेंगुर्ल्याचे केंद्रप्रमुख महादेव आव्हाड उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या सीमा नाईक यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास नाईक यांच्या उपस्थितीत सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. या आनंद मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान साटेलकर, उपाध्यक्ष राकेश सापळे, प्रधान मंत्री आहिर प्रजापत, सांस्कृतिक मंत्री गुरुदेव दामले, पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ, सर्व शिक्षक वृंद व पालक यांनी केले आहे.
....
पणदूर महाविद्यालयचे
विज्ञान प्रदर्शनात यश
कुडाळः कनेडी हायस्कूल (ता. कणकवली) येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठाने दुहेरी यश संपादन केले. या विज्ञान प्रदर्शनात वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गट : प्रथम क्रमांक-दीक्षा भिके व दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक गटात शुभम राठोड याने तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक आर. जी. कर्पे, लाड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापक संजय गावकर, संस्थाध्यक्ष रघुनाथ गावडे, सचिव नागेंद्र परब, संस्था संचालक, पर्यवेक्षक एम. जी. कर्पे, सर्व शिक्षक यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
....
टेंब्येस्वामी पादुकांचे
वेंगुर्लेत आज आगमन
कुडाळः आंदुर्ले-विराचे पाणी येथील संतोष पाटील यांच्या निवासस्थानाकडे उद्या (ता. ८) सायंकाळी ५.३० वाजता श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज यांच्या पादुकांचे आगमन होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता श्री पादुकांचे आगमन, ७ वाजता सायंपूजा, ७.३० वाजता कीर्तनकार वासुदेव जोशी यांचे कीर्तन, गुरुवारी (ता. ९) पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता श्री सत्यदत्तपूजा, श्री पादुकांची पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता पादुकांचे प्रस्थान होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील-पाडगावकर परिवार यांनी केले आहे.
....
शिराळेत मोबाईल
टॉवर कामास प्रारंभ
शिराळेः येथे बीएसएनएल मोबाईल टॉवरच्या कामाचा शुभारंभ देव गांगो देव रवळनाथ, देवी यांच्या चरणी श्रीफळ वाढवून करण्यात आले. या टॉवरसाठी खासदार नारायण राणे, मत्स्य बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे. यासाठी भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष तथा सडुरे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी पाठपुरावा केला. या टॉवरमुळे सडुरे व शिराळ गावातील लोकांना मोबाईल सेवा उपलब्ध होणार आहे. याबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. माजी उपसरपंच सखाराम पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य कोंडू शेळके, गंगुबाई शेळके, शिराळे भाजपा बूथ अध्यक्ष विजय पाटील, शिराळे भाजपा भटके विमक्त आघाडी बूथ अध्यक्ष विठ्ठल उफ बाळा शेळके, रामचंद्र बोडेकर, अंबाजी बोडेकर, गंगाराम बोडेकर, घाटू कोकरे, संजय कोकरे, अंबाजी बोडेकर, रामचंद्र शिंदे, नंदा बोडेकर, रुक्मिणी शेळके, महेंद्र शेळके जेसीबी मालक भिकाजी आदी उपस्थित होते.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT