36981
नव्या उमेदीने पक्ष संघटना उभारूया
संदेश पारकर : शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी खचून जाऊ नका. नव्याने पक्ष संघटना बांधून एकसंधपणे काम करूया. पुढील काळात आपणास निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले.
शिवसेना ठाकरे गटाच्या कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक मातोश्री मंगल कार्यालयात झाली. यात श्री.पारकर यांच्यासह माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, विधानसभा संघटक सतीश सावंत, उपनेते गौरीशंकर खोत आदींनी मार्गदर्शन केले.
परशूराम उपरकर म्हणाले, ‘‘शिवसेना पक्ष सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे. मात्र, जनतेने दिलेला कौल मान्य करून येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून सिंधुदुर्गात सक्षमपणे विरोधी पक्षाचे काम आपण करूया.’’
यावेळी महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उपतालुका प्रमुख बाबू पेडणेकर, आबू पटेल, जयसिंग नाईक, महिला तालुका संघटक वैदेही गाडेकर, उपतालुका संघटक संजना कोलते, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, प्रतीक्षा साटम, अनुप वारंग, तात्या निकम, धनश्री मेस्त्री, राजू राठोड, सचिन सावंत, तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, रुपेश आमडोस्कर, राजू रावराणे, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री आदी उपस्थित होते.
---
‘भविष्यात शिवसेनेलाही संधी मिळेल’
वैभव नाईक म्हणाले, ‘‘ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्यासाठी आपल्याला लढावेच लागेल. प्रत्येकाला संधी मिळत असते. भविष्यात शिवसेनेलाही संधी मिळेल. त्यासाठी आपण काम करीत राहिले पाहिजे.’’ सतीश सावंत म्हणाले, ‘‘सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम यापुढेही आपण सुरु ठेवले पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने जनतेच्या न्याय हक्कासाठी झगडले पाहिजे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.