rat७p२४.jpg
P२५N३६९४५
- पावस ः थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या श्रेया भरणकरला सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले.
तालुकास्तरीय स्पर्धेत श्रेयाला सुवर्णपदक
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ७ ः जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धेत मुलींच्या मोठ्या गटातून थाळीफेक क्रीडाप्रकारात तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं. १ च्या श्रेया भरणकरने सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे जिल्हास्तरावर ती रत्नागिरी तालुक्याचे नेतृत्व करणार आहे.
रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू आहेत. शाळेने क्रीडास्पर्धेत केलेल्या जिल्हास्तरीय हॅट्ट्रिकबद्दल माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच विजय चव्हाण, निर्मल ग्रामपंचायत नाखरे सरपंच विद्या जाधव आणि सदस्य, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रामदास लांजेकर आणि सदस्य तसेच मुख्याध्यापक शशिकांत घाणेकर यांनी कौतुक केले आहे. केंद्रस्तर क्रीडा स्पर्धात नाखरे शाळेने सांघिक स्पर्धेत मुलींचा कबड्डी संघ विजयी तर खो -खोत मुलांचा संघ उपविजयी ठरला. लहान गटात खो-खोत मुले उपविजयी झाले. वैयक्तीक स्पर्धेत लहान गटातून ओम गुरव याने धावणे द्वितीय, उंच उडी प्रथम, मोठा गट अश्विनी हरमले (लांब उडी प्रथम), श्रेया भरणकर, श्रुती भरणकर (थाळीफेक प्रथम, द्वितीय) यांनी यश मिळविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.