36985
पोलिसांच्या मदतीस पुढे या
अप्पर पोलिस अधीक्षक रावले : ‘रेझिंग डे’ प्रदर्शनाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ : पोलिसांबद्दलची नकारात्मक भावना बदलून नागरिकांनी पोलिसांच्या मदतीसाठी पुढे यायला हवे. यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालता येईल. एक चांगला समाज घडवता येईल. एखाद्या अनुचित प्रकार घडत असताना केवळ पोलिसांवरच जबाबदारी न टाकता साध्या वेशातील नागरिकांनीही मदतीसाठी पुढे यायला हवे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी केले.
पोलिस दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलिस दलातर्फे येथील बसस्थानकासमोर तीन दिवसीय ‘रेझिंग डे’ प्रदर्शन सुरू केले आहे. याचे उद्घाटन श्री.रावले यांनी केले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमावेळी पोलिस गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सचिन हुंदळेकर, कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप, सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, राजेंद्र गाडेकर, प्रदीप चव्हाण, विनोद चव्हाण, किरण मेथे, राज आघाव आदी उपस्थित होते.
दरम्यान, कणकवली येथील प्रदर्शनात सायबर पोलिस ठाणे, नियमित पोलिस ठाणे कामकाज, डायल ११२, भरोसा (महिला) सेल, फॉरेन्सिक युनिट, शस्त्रांची माहिती, जिल्हा वाहतूक शाखा, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक, सागरी सुरक्षा, बिनतारी संदेश आदी विभागांची माहिती स्टॉलच्या माध्यमातून दिली जात आहे. कणकवली शहरातील तसेच तालुक्यातील अनेक नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन त्यांच्या विविध विभागांची व शस्त्रांची माहिती घेतली.
---
‘रेझिंग डे’ सप्ताह सुरू करणार!
श्री.रावले म्हणाले की, ‘‘आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरही लोकांच्या मनात पोलिसांबद्दल ब्रिटिश काळात जसा धाक होता तसाच आहे. त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. भीती दूर करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून हे प्रदर्शन आयोजित केले आहे. मात्र एका दिवसात लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता ‘रेझिंग डे’ सप्ताह सुरू करण्यात येणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.