कोकण

रत्नागिरी- चार स्तंभांवरील विश्वास ढळला तर अस्थैर्याला आमंत्रण

CD

rat7p25.jpg-
36988
रत्नागिरी : करसल्लागार असोसिएशनच्या वर्धापनदिनी व्याख्याते विजय कुवळेकर यांचा सत्कार करताना वरदराज पंडित. सोबत राजेश गांगण, सीए विवेक रेळेकर, अभिजित पटवर्धन, वैभव देवधर.
------------
चार स्तंभांवरील विश्वास ढळला तर अस्थैर्याला आमंत्रण
विजय कुवळेकर ; करसल्लागार असोसिएशनचा आठवा वर्धापनदिन
रत्नागिरी, ता. ७ : कोणताही व्यवसाय विश्वासावरच अवलंबून असतो. माणसाच्या आयुष्यातून विश्वास वजा केला तर काही शिल्लक राहत नाही. शिक्षणाने फक्त पदवी मिळून उपयोग नाही तर संस्कार मिळायला हवा, शिक्षणाने चारित्र्य घडवलं पाहिजे. तेव्हाच विश्वास बसतो. वाचकाचा व प्रेक्षकांचा नकाराधिकार ही आपल्याकडची मोठी ताकद आहे. तिचा वापर आपण सजग व्यक्तींनी योग्य वेळी केला पाहिजे. भारताच्या चार स्तंभांवरचा विश्वास जर ढळला तर अस्थैर्याला आमंत्रण असतं. पण पुढच्या काळामध्ये याचे दुष्परिणाम दिसायला लागतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विजय कुवळेकर यांनी केले.
करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा या संस्थेच्या आठव्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी चिपळूण येथील प्रसिद्ध सीए विवेक रेळेकर उपस्थित होते. त्यांनी सीए, करसल्लागार यांच्या कामकाजाबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. मंचावर करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष वरदराज पंडित, उपाध्यक्ष राजेश गांगण, कोषाध्यक्ष अभिजित पटवर्धन, सचिव वैभव देवधर उपस्थित होते.
श्री. कुवळेकर म्हणाले की, लहान मूल आईच्या कुशीत निर्धास्थपणाने विसावतं किंवा आईजवळ बिलगतं. त्याला विश्वास असतो, तो त्याला सांगता येत नाही. पती-पत्नी मैत्री, शिक्षक- पालक- विद्यार्थी, डॉक्टर- रुग्ण, वकील- अशील आर्थिक संस्था, दुकानदार- ग्राहक या सर्वांमध्ये विश्वास असावा लागतो. डॉ. राधाकृष्णन असं म्हणाले होते की, माणसाला माणूस बनवतो ते खरं शिक्षण. आपण शिक्षणाची सांगड ही पदव्यांशी जोडलेली आहे. पदव्यांमधून आर्थिक उत्पन्नाशी जोडलेली आहे. सुदैवाने मोदी सरकारने जे नव शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं आहे त्यात संस्कारालाही महत्त्व आहे. आज मोठ्या शहरांपासून अगदी ग्रामीण भागातल्या खेडोपाड्यांतही फ्लेक्स, होर्डिंगचे साम्राज्य दिसते, असे सांगत सी. व्ही. रमन, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, रामभाऊ म्हाळगी, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आदींचे संदर्भ देत कुवळेकर यांनी सुरेख मांडणी केली.

चौकट
नैराश्य, घटस्फोटांचे प्रमाण वाढले
श्री. कुवळेकर म्हणाले, समाजात सध्या नैराश्य आणि घटस्फोटांचे वाढले आहेत. लग्न झाल्यानंतर अत्यंत थोड्या कालावधीत घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढलेय. मुलांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. याचं कारण आई-वडिलांपासूनचा स्वतंत्र राहण्याने येणारा दुरावा आणि त्यातून येणारी असुरक्षितता. नवरा मोठ्याने घोरतो, वाढदिवसाला आवडीचा केक आणला नाही म्हणून घटस्फोट घेतला जातोय. पण यात व्यवहार आला, विश्वास नाही आणि पती-पत्नी हे नातं विश्वासाचं नातं आहे.

चौकट
डॉ. पेठे, सीए जोशींचा सत्कार
रत्नागिरीतील डॉ. प्रसाद पेठे यांच्या रुग्णसेवेबद्दल आणि उल्लेखनीय यशाबद्दल सीए अक्षय जोशी यांचा या वेळी विशेष सन्मान करसल्लागार असोसिएशनने केला. डॉ. पेठे यांनी रुग्णसेवेतील काही अनुभव सांगितले. सीए जोशी यांनीदेखील सीए, डिसा व अन्य पदवी परीक्षेतील यश कीर्तनसेवा यांची माहिती देत हा घरचा सन्मान असल्याबद्दल आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT