कोकण

सिंधुदुर्गात आज भाजपच्या आढावा बैठका ः देसाई

CD

37010

सिंधुदुर्गात आज भाजपच्या
आढावा बैठका ः देसाई

सदस्य नोंदणी अभियानाबाबत माहिती घेणार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला असून याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्गात १ ते १५ जानेवारी दरम्यान पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान सुरू केले आहे. खासदार नारायण राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष व अभियानाचे जिल्हा प्रभारी महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (ता.८) जिल्ह्यातील तीन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये या अभियानाच्या आढावा बैठका होणार आहे, अशी माहिती अभियानाचे जिल्हा संयोजक व पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी दिली.
श्री. देसाई म्हणाले, ‘‘उद्या सकाळी ११ वाजता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची बैठक बॅरिस्टर नाथ पै हॉल नगरपरिषद सावंतवाडी येथे होणार असून दुपारी २.३० वाजता कुडाळ विधानसभा मतदारसंघाची बैठक शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे व कणकवली विधानसभा मतदारसंघाची बैठक प्रहार भवन कणकवली येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या बैठकांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर झालेल्या नोंदणीचा आढावा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपने दिलेले प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे एक लाख सभासदांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच संघटन पर्वाचे प्रदेश प्रभारी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सिंधुदुर्गमधील सर्वच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला असून १५ जानेवारीपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू. उद्या होणाऱ्या बैठकीला सर्व बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, सरपंच, उपसरपंच सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, सर्व मोर्चा व प्रकोष्ठांचे पदाधिकारी तसेच पक्षाचे तालुका व जिल्हा कार्यकारणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी अहवालासह उपस्थित राहावे.’’ यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य पप्या तवटे , युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, माजी नगरसेवक सुनील बांदेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

Latest Marathi Update Live: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा मांढरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर हवालदारला सीबीआय कोठडी

खेकडेच राहणार तुम्ही... रितेश देशमुखच्या त्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांमध्येच जुंपली; चाहत्यांनी ट्रोलर्सना सुनावलं; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Rice Theft : गोदामातून तांदळाची 72 पोती चोरणाऱ्या तीन महिलांना अटक; मध्यरात्री टेम्पो बोलावून नेली पोती

SCROLL FOR NEXT