37011
बदलत्या जीवनशैलीने आजारांचा धोका
डॉ. अनिकेत वजराटकर ः वेंगुर्लेत मेडिकल असोसिएशनतर्फे कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ ः आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी तसेच जीवनशैलीमुळे अनेक आजार होत आहेत. त्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढत आहे. आहारातील भाज्या, फळांचे प्रमाण कमी झाल्याने याचाही शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे तरुणवर्गासह वृद्धांनीही खाण्यापिण्याच्या सवयींवर वेळीच आवर घालावा, असे आवाहन मूळव्याध शल्य चिकित्सक डॉ. अनिकेत वजराटकर यांनी येथे केले.
मेडिकल असोसिएशनतर्फे येथील साई डिलक्स सभागृह येथे आयोजित डॉक्टरांच्या कार्यशाळेत डॉ. वजराटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, सचिव डॉ. संजीव लिंगवत, डॉ. प्रल्हाद मणचेकर, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग वजराटकर, मोना वजराटकर उपस्थित होते.
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ पाटील यांनी वाढत्या संधीवात व गुडघ्याच्या तक्रारींबाबत मार्गदर्शन केले. वयानुरुप गुडघ्यांची काळजी कशी घ्यावी, हे सांगून चालणे हा उत्तम व्यायाम असल्याचे सांगितले. कार्यशाळेत आयोजित प्रश्नमंजुषा कार्यक्रमात डॉ. वजराटकर व डॉ. सौरभ पाटील यांनी समर्पक उत्तरे दिली. डॉ. ज्ञानेश्वर शिवचरण, डॉ. डी. पी. गोसावी, डॉ. किरण नाबर, डॉ. प्रसाद साळगावकर, डॉ. नामदेव मोरे, डॉ. वसुधा मोरे, डॉ. सुबोध माधव, डॉ. संजय रावळ, डॉ. सुप्रिया रावळ, डॉ. महेंद्र सावंत, डॉ. जाई पेडणेकर, डॉ. अश्विनी सामंत, डॉ. प्रदीप शेटकर, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, डॉ. अभिजित वणकुद्रे, डॉ. सुदीश सावंत, डॉ. सोनाली सावंत, डॉ. सुरेखा काळे, डॉ. मिलिंद काळे, डॉ. के. जी. केळकर, डॉ. मनोज आरोसकर, डॉ. सतीश पाटील, डॉ. रायाजी सातोसकर, डॉ. अमरेश होडावडेकर, डॉ. दत्ता पवार, डॉ. प्रभू, डॉ. प्रणाली सावंत आदी उपस्थित होते. डॉ. उबाळे यांनी स्वागत केले. डॉ. संजीव लिंगवत यांनी आभार मानले.
..................
‘अतिसार, स्थुलता वाढण्याची शक्यता’
डॉ. वजराटकर म्हणाले, ‘‘खाण्यात चायनीज पदार्थांचा वाढता वापर, बेकरी उत्पादने जास्त खाणे यामुळे अतिसार, वजन वाढणे आदी व्याधी होऊ शकतात. आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स कमी असणे, पाणी कमी पिणे, व्यायाम करताना जड वजन उचलणे यामुळे बद्धकोष्ठता व मुळव्याध होतो. यामुळे चुकीच्या सवयी वेळीच बदलणे गरजेचे आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.