कोकण

वेंगुर्ले येथे शुक्रवारपासून राज्यस्तर एकांकिका स्पर्धा

CD

वेंगुर्ले येथे शुक्रवारपासून
राज्यस्तर एकांकिका स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ ः ''कलावलय'' संस्था वेंगुर्ले यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारी (कै.) शशिकांत येरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १० ते १२ जानेवारी या कालावधीत वेंगुर्ले येथे आयोजित केली आहे. ही स्पर्धा येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १०) ज्येष्ठ सिने अभिनेते नंदकुमार पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्गसह रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई येथील स्पर्धक सहभागी होणार आहेत. उद्घाटनप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राजन गिरप, उद्योजक दिगंबर नाईक, बीकेसीचे सतीश डुबळे, ''कलावलय''चे अध्यक्ष बाळू खामकर, पदाधिकारी संजय पुनाळेकर, सुनील रेडकर आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूर यांची ''कलम ३७५'', उगवाई कलारंग-फोंडाघाट यांची ''जापसा'', संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळची ''ऑफलाईन'', ढ मंडळी कुडाळ यांची ''वाल्मिकी'', ११ ला सायंकाळी ४ वाजता मुख्तलीफ थिएटर कोल्हापूर यांची ''निर्झर'', शब्दांकूर रंगमंच-आरवली यांची ''ओळख'', नाटकवेडे रत्नागिरीची ''विठाई'', मॅडबॉक्स थिएटर-नवी मुंबई यांची ''मैं'', कलांगण मालवण यांची ''विवर'', १२ ला दुपारी ३ वाजता गायन समाज देवल क्लब कोल्हापूर यांची ''ऑलमोस्ट डेड'', दृष्टी-पुणे यांची ''ओळख'', थिएटरवाले मुंबईची ''चोली के पिछे क्या है'', बी. व्ही. थिएटर्स कुडाळची ''ऑफलाईन'', अंब्रेश्वर थिएटर्स मुंबई यांची ''चारू'', कलासक्त मुंबई यांची ''पूर्णविराम'', क्रीएटिव्ह कार्टी यांची ''इंटररोगेशन'' अशा एकांकिका सादर होणार आहेत. नाट्य रसिकांनी या एकांकिका स्पर्धेला उपस्थित राहावे, असे आवाहन कालावलय परिवारातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT