कोकण

-पावस एज्युकेशन सोसायटीला विजेतेपद

CD

पावस एज्युकेशन सोसायटीला विजेतेपद

उर्दू माध्यम शाळांसाठी स्पर्धा ; १६० विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ७ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी विविध शैक्षणिक स्पर्धा पावस एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात झाल्या. या स्पर्धांमध्ये उर्दू माध्यमाच्या विविध शाळांमधून एकूण १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पावस एज्युकेशन सोसायटी संचलित जुलेखा दाऊद काजी हायस्कूल, मुराद उमर मुकादम व राबिया शेख अहमद नाखवा कनिष्ठ महाविद्यालय आणि ए. ई. कालसेकर प्रीप्रायमरी अँड प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकूण सात बक्षिसे पटकावून १६ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. आयडियल फाउंडेशन मुंबईची शैक्षणिक शाखा कोकण टॅलेंट फोरमच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये उमैमा सरफराज गावखडकर (प्रथम, वादविवाद स्पर्धा), अस्मिना शराफत दर्वेश (प्रथम, उर्दू निबंध लेखन), फिरदोस इमरान गावखडकर (प्रथम, बुद्धिमत्ता), नवमान नजीर अहमद कोल्हार (प्रथम, बुद्धिमत्ता प्राथमिक), जमील अहमद अतीक फोंडू (द्वितीय, वक्तृत्व), मारिया जाबीर पावसकर (द्वितीय, इंग्रजी व्याकरण), उमेरा मोहसीन काझी (उत्तेजनार्थ, इंग्रजी निबंध लेखन).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये खळबळ! अंगरक्षकाची बंदूक घेत धमकी दिली, धनंजय देशमुखांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

मुंबई इंडियन्सच्या 'या' पठ्ठ्याने भाव खाल्ला, ईशान किशनपेक्षाही टी२० लीगच्या लिलावात महागडा ठरला

Illegal Night Camping : शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई; दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर; 'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण!

SCROLL FOR NEXT