कोकण

रत्नागिरी- रत्नागिरीत महाभारतावर

CD

रत्नागिरीत आजपासून महाभारतावर कीर्तनसंध्या
रत्नागिरी, ता. ७ : रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवाचे १४वे पर्व बुधवारपासून (ता. ८) सुरू होणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारूदत्त आफळेबुवा महाभारतावरील निरूपण करणार आहेत. १२ जानेवारीपर्यंत हा महोत्सव सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात होणार आहे.
आफळेबुवांना केदार लिंगायत (तबला), प्रथमेश तारळकर (पखवाज), चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम), उदय गोखले (व्हायोलिन), अमेय किल्लेकर (एबल्टन) संगीतसाथ करणार आहेत. गेली तेरा वर्षे कीर्तनसंध्या महोत्सवात भारताचा देदिप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. गेल्या वर्षी अयोध्येतील राममंदिर पुनर्निमाणाचे औचित्य साधून "आले रामराज्य" या विषयावर रामकथा, गीत रामायण आणि कीर्तन असा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळीसुद्धा असाच एक ऐतिहासिक कालखंड कीर्तनप्रेमींसमोर आणण्याचा प्रयत्न कीर्तनसंध्या समूह करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

Nagpur: वैद्यकीय पदवी घेणारी पत्नी मानसिक अस्थिर कशी; आयपीएस अधिकाऱ्याची याचिका फेटाळली

Nagpur: नवतपाच्या पहिल्याच दिवशी चटके; ब्रह्मपुरीचा पारा ४७.६ तर, नागपूर ४६.५ अंशांवर

Rwanda Economy: रवांडा : आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थव्यवस्था

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळ दूध संघात सतेज पाटील, मंत्री मुश्रीफांचे एकत्र पॅनेल? उघडउघड विरोध की अंतर्गत मैत्री जपणार

SCROLL FOR NEXT