rat७p२९.jpg
25N37116
काजरघाटीतील तरुण आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन विद्रुप झालेला परिसर स्वच्छ करून तिथे फलक लावले आहेत.
-------
डंपिंग ग्राउंड करणाऱ्यांना धडा शिकवणार
काजरघाटी ग्रामस्थ आक्रमक; सुशिक्षितांचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : तालुक्यातील काजरघाटी गाव सध्या वेगळ्याच विषयावरून चर्चेत आहे. इतर गावातील ग्रामस्थ या गावाच्या परिसराला कचराकुंडी बनवत आहेत. आणखी एकाने हद्दच केली. चांदेराई येथील एका व्यक्तीने १८ किमी अंतरावरून गाडीतून कचरा आणून काजरघाटी गावात टाकत असल्याचे ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून त्याला समज दिली आहे. कचरा टाकणाऱ्यांमध्ये सुशिक्षितांचा समावेश आहे. यामुळे काजरघाटी धारेपासून गावातील रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचा यापुढे चांगलाच समाचार घेतला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सोशल मीडियावर या गावातील ग्रामस्थांनी दुसऱ्या गावातील ग्रामस्थाला कचरा टाकताना पकडल्याचा व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल झाली आहे. तालुक्यातील काजरघाटी निसर्गरम्य गाव म्हणून ओळखले जाते; परंतु काही दिवसांपासून या गावाला इतर गावातील बेशिस्त ग्रामस्थ गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या घरातील कचरा रस्त्यावर आणून टाकला जात आहे. यात प्रामुख्याने सुशिक्षित लोकांचा समावेश आहे. या कचऱ्यामुळे गावात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा त्रास होऊ शकतो याची जाणीव त्यांना नाही.
चांदेराईतील एका व्यक्तीला इथल्या ग्रामस्थांनी रंगेहाथ कचरा टाकताना पकडले. त्याला योग्य समज देऊन पुन्हा कचरा गाडीत भरून परत पाठवले. यापुढे काजरघाटी धारेपासून गावातील रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला जाईल, असे ग्रामस्थांनी ठणकावले आहे.
---
ग्रामस्थांनी साफ केला कचरा
ग्रामस्थांनी काजरघाटी येथील कचराकुंडी बनवलेला भाग ग्रामस्थांनी स्वतःहून साफ केला आहे. त्या ठिकाणी बोर्ड लावले आहेत. टाकलेल्या कचऱ्यामधील कागदपत्र शोधून मोबाईल नंबर मिळवून कचरा टाकणाऱ्याला ग्रामस्थांनी शोधून काढून त्याला समज दिल्याचे प्रकार उघड झाले आहेत.
कोट
बेशिस्त ग्रामस्थांनी कचरा केल्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरासमोर कचरा आहे, असे समजून त्याची विल्हेवाट लावावी. यापुढे कुठेही कचरा टाकणाऱ्यांना आम्ही चांगलीच अद्दल घडवू.
- सुमित पिलणकर, ग्रामस्थ, काजरघाटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.