37046
क्रीडा महोत्सवात मालवण पालिका सरस
जिल्हास्तरीय स्पर्धा; कर्मचाऱ्यांनी केली पदके, चषकांची लयलूट
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय नगरपरिषद, नगरपंचायत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव वेंगुर्ले येथे पार पडला. या महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये येथील पालिकेच्या स्पर्धकांनी विजय मिळवित विविध पदके, चषक पटकावले.
यात व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकावले. या संघात संतोष जिरगे, हर्षल तारी, अनिकेत चव्हाण, मंदार केळुसकर, दिनेश राऊत, अमोल काटवळ, भास्कर राऊळ, सदाशिव घाडीगावकर, सागर नरे, वरुणराज अभ्यंकर यांचा सहभाग होता. कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. या संघात मिथुन शिगले, अनिकेत चव्हाण, अमोल काटवळ, मकरंद सोहनी, भालचंद्र परब, सागर जाधव, मयुर पाटील, सागर नरे, पांडुरंग तळवडेकर, विश्राम जाधव यांचा सहभाग होता. रस्सीखेच स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला. यात दिनेश राऊत, अमोल चौगुले, दीपक पवार, मिथुन शिगले, रुपेश हडकर, अनिकेत चव्हाण, भालचंद्र परब, पांडुरंग तळवडेकर, सागर नरे, सागर जाधव यांचा सहभाग होता.
वैयक्तिक स्पर्धेत थाळीफेकमध्ये अनिकेत चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकावले. लांब उडी, ५० मीटर पोहणेमध्ये मयुर पाटील यांनी प्रथम सुवर्णपदक, वैयक्तिक गायनमध्ये सुभाष कुमठेकर यांनी सुवर्णपदक पटकावले. ३ किलोमीटर चालणेमध्ये अमोल चौगुले यांनी सुवर्ण, मयुर पाटील यांनी रौप्य तर भास्कर राऊळ यांनी कांस्यपदक मिळवले. बुद्धिबळ स्पर्धेत संध्या गवळी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. गायन विशेषमध्ये सुभाष कुमठेकर, सुनील कदम, संदीप घाडी, संध्या गवळी, वीणा पारधी, कृपा मयेकर, पूर्वा कीर्तने, अक्षता गोसावी, रेश्मा परुळेकर, लुबना खान यांनी सुवर्णपदक मिळविले. स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, महेश परब, सुधाकर पाटकर, आनंद म्हापणकर, राजा केळीपाळे, हेमंत आचरेकर यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.