कोकण

चंपक मैदानात दारू पिणाऱ्याविरुद्ध गुन्हा

CD

चंपक मैदानात दारू
पिणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील चंपक मैदान येथील सार्वजनिक ठिकाणी झा़डाच्या आडोशाला दारू पिणाऱ्या प्रौढाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. खाजापटेल इमामपटेल तळोळी (वय ४४, रा. झाडगाव, एमआयडीसी रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) रात्री साडेआठच्या सुमारास चंपक मैदान येथील झाडाच्या आडोशाला निदर्शनास आली. संशयित हा मद्य प्राशन करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल रूपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------
कोतापूरमध्ये
दारू जप्त
रत्नागिरीः विनापरवाना राज्य व गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बाळणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरुद्ध राजापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जनक आत्माराम जाधव (४४, रा. कोतापूर, बौद्धवाडी, ता. राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) दुपारी साडेचारच्या सुमारास कोतापूर बौद्धवाडी येथील बुद्धविहाराच्या मागील बाजूस निदर्शनास आली. कोतापूर येथे विनापरवाना राज्य व गोवा बनावटी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी २ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार हर्षदा चव्हाण यांनी राजापूर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

Online Gaming करताय? तर तुमच्या मोबाईलमध्ये असली पाहिजे 'ही' एक गोष्ट, मोठ्या धोक्यांपासून करेल सुरक्षा

'मला मूल नको होतं' पूजा भट्टने सांगितलं घटस्फोट घेण्याचं कारण, म्हणाली...'नात्यात एकटेपणा हा...'

Rainwater Harvesting: आदर्श मान्याचीवाडी होणार आता पाण्याचीवाडी; घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी साठवणाऱ्या घरांचीच होणार नोंद

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या ‘समर्थ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !

SCROLL FOR NEXT