कोकण

तत्कालीन ग्रामसेवकाची जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी

CD

लोगो
बांगलादेशीचा रत्नागिरीत जन्म


तत्कालीन ग्रामसेवकाची चौकशी
जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल ः शिरगाव ग्रामपंचायतीचे दप्तर तपासले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : बांगलादेशी नागरिकाला शिरगाव ग्रामपंचायतीतून जन्मदाखला दिल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकाची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी चौकशी केली. या गंभीर प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी सिंह यांनी लक्ष घातले आहे. ग्रामपंचायतीचे दप्तर तपासले. कोरोना काळामध्ये मे २०२० मध्ये हा जन्मदाखला दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सिंह यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांना एका गुन्ह्यात बांगलादेशी संशयित आरोपी सापडला आहे. त्याच्या चौकशीनंतर या प्रकरणाची पाळेमुळे रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीशी जोडल्याचे उघड झाले आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीला नोटीस दिली असून, या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मोहम्मद इद्रीस इसाक शेख या बांगलादेशी नागरिकाला शिरगाव ग्रामपंचायतीतून जन्म दाखला दिल्याची नोंद आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाबाबत संबंधित ग्रामपंचायतीची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी लावली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर यामध्ये काय तथ्य आहे हे स्पष्ट होईल, अशी माहिती सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली होती.
कलम १७९ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये कलम ३५ (तीन) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये या कलमाद्वारे संबंधित लोकांना मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावले आहे. सुरक्षेचा विषय असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याची गंभीर दखल केली. या प्रकरणानंतर गायब असलेल्या ग्रामसेवकाला बोलवून त्याची चौकशी केली. तत्कालीन नोंदी तपासल्या. त्यामध्ये हा दाखला देण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. कोरोना काळामध्ये मे २०२० ला हा जन्मदाखला देण्यात आल्याचे चौकशीत समजते, तसेच संबंधित ग्रामसेवकाचे रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण गंभीर असून, चौकशीनंतर संबंधितावर कडक कारवाई होईल, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले.

तत्कालीन सरपंचाला नोटीस
मुंबई पोलिसांनी तत्कालीन सरपंचाला २५ डिसेंबरला २०२४ नोटीस दिली असून, चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. मुंबईत एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी शेख याला खोटा जन्म दाखला बनवून देण्यास सहकार्य केल्याबद्दल चौकशीला हजर राहावे, असे नोटिसीमध्ये नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT