-rat७p३७.jpg-
२५N३७०८२
रत्नागिरी ः राजापूर-लांजा विधानसभेचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुक बंड्या साळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी.
-rat७p३८.jpg-
P२५N३७०८३
किरण सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर झालेली गर्दी.
----------
आमदार किरण सामंतांवर शुभेच्छांचा वर्षाव
विविध कार्यक्रमांचे आयोजन; नागरिकांची मोठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : राजापूर-लांजा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव झाला. परंतु रत्नागिरीतील सोहळ्यातील अनेक नेते मंडळींमध्ये प्रामुख्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मांदियाळी दिसून आली. त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंडया साळवी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी उघड शुभेच्छा दिल्या.
किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघासह रत्नागिरीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी आठ वाजल्यापासून पाली निवास्थानी, त्यानंतर रत्नागिरी आणि दुपारनंतर मतदारसंघात सामंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. रत्नागिरीतमध्ये आज वेगळेच वातावरण दिसले. लोकसभेचा आणि विधानसभा निवडणुकीत उबाठाचा पाडाव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चलबिचल सुरु आहे. सामंत यांना प्रत्यक्षात शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमावेळी ठाकरे गटा‘तील पदाधिकाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली. शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांच्यासह उद्धव सेनेचे विभागप्रमुख महेंद्र झापडेकर, उपतालुकाप्रमुख राकेश साळवी, संघटन सचिव संदीप सुर्वे यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. आजपर्यंत सामंत बंधूंना मोबाईलवरुन शुभेच्छा दिल्या जात होत्या. मात्र आज प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. आता या शुभेच्छा आगामी राजकारणात कशाची नांदी ठरणार ते येणाऱ्या काळात दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.