कोकण

हुमरस येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या

CD

हुमरस येथे तरुणाची
गळफासाने आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः कोलगाव येथील आयटीआयमध्ये शिकणारा हुमरस-न्हावीवाडी येथील गणेश प्रकाश नायर (वय १९) याने काजूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुमरस न्हावीवाडी येथीस गणेश नायर हा युवक आयटीआयमध्ये शिकत होता. आज घरी आल्यानंतर त्याने शेजारी राहणाऱ्या राजाराम लाड यांच्या आईला ‘बैल आणायला जातो’ असे सांगून घराच्या पडवीतील नायलॉन दोरी घेऊन निघून गेला, तो उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्याचा मावस भाऊ मंगेश धोत्रे हा त्याच ठिकाणी राहतो. त्याला लाड यांच्या आईने याबाबत माहिती दिली. मंगेश व गणेशचे वडील त्याला शोधण्यासाठी गेले असता लाड यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या काजूच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत तो आढळून आला. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Marathi News Live Update : अकोल्यातल्या दहीहंडामध्ये कडाक्याच्या उष्णतेनंतर पावसाची हजेरी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

SCROLL FOR NEXT