अल्पवयिन मुलीची छेडछाड
दापोली:- जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे यावर वेळीच पडदा पडला.
पीडित अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. सोमवारी (ता. ६) रात्री दोन मुलांकडून रस्त्याने जाणाऱ्या मुलीला थांबवून छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या पीडित मुलीने आरडा ओरड केल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू केली. या प्रकरणामुळे परिसरातील शांततेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरीहुन तातडीने राखीव दलाचे सुमारे ३० पोलिसांच्या तुकडीला बोलविण्यात आले आहे. यामधील छेडछाड करणारा हा अल्पवयीन असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
-----
छेडछाड प्रकरणी
तरुणास अटक
साडवली : संगमेश्वर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या छेड काढल्या प्रकरणी तरुणाला पोलीसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रासिक कासम बोट(वय २४) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तालुक्यात राहणारा रासिक हा गेली दीड वर्षे एका अल्पवयीन मुलीला दुरध्वनी करून, पाठलाग करणे तसेच प्रत्यक्ष भेटून नाहक त्रास देत होता. वारंवार छेडछाड करत होता. याप्रकरणी रासिक बोट याला मुलीच्या नातेवाईकांकडून समज देखील देण्यात आली होती. मात्र रासिकच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून पिडीतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली. रासिकला आज न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.