कोकण

रत्नागिरी-टुडे पान १साठी संक्षिप्त पट्टा

CD

जोशी ग्रंथालयात
ग्रंथ प्रदर्शन
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (कै.) बाबुराव जोशी ग्रंथालयात महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियान २०२५ या वाचनविषयक उपक्रमांतर्गत मकर संक्रांत आणि मार्लेश्वर यात्रेचे औचित्य साधून कोकणः पर्यटन, सण आणि उत्सव या विषयाला वाहिलेल्या ग्रंथसंग्रहाचे प्रदर्शन आयोजित केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीचे पूजन करून या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रसंगी उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. एस. डी. मधाळे, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. शिवराज गोपाळे, ग्रंथपाल किरण धांडोरे, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, डॉ. दानिश गनी उपस्थित होते. स्वागत सहाय्यक ग्रंथपाल उत्पल वाकडे यांनी केले. डॉ. साखळकर यांनी आपलं कोकण, कोकणातील पर्यटन सण आणि उत्सव यांची माहिती होण्यासाठी ग्रंथप्रदर्शन सर्वांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
----------
गोगटे महाविद्यालयात
मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील इतिहास विभागातर्फे मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय (मुंबई) यांच्या सहकार्याने आयोजित या वर्गामध्ये मोडीलिपीचा इतिहास, अक्षरओळख, वाचन व लेखन याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण वर्ग सर्वांसाठी खुला असून, यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल. मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग २० ते ३० जानेवारी या कालावधीत संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत महाविद्यालयात होईल. मोजक्या जागाच उपलब्ध असल्याने इच्छुकांनी त्वरित नावनोंदणी करावी. मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाविषयी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी प्रा. पंकज घाटे, इतिहास विभाग यांच्याशी संपर्क साधावा.
-----------
मुंबई विद्यापीठ संघात
गोगटेतील तिघांची निवड
रत्नागिरी ः पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेकरिता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) अथर्व फडणीस (प्रथम वर्ष कला), चेतन जाधव (प्रथम वर्ष कला) आणि सौरभ झगडे (एम.कॉम. भाग-२) या तीन विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल संघात निवड झाली. सौराष्ट्र विद्यापीठ, (राजकोट, गुजरात) येथे होणाऱ्या पश्चिम विभाग स्पर्धेसाठी ते रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, जिमखाना समितीचे उपाध्यक्ष क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, डॉ. विवेक भिडे, क्रीडाशिक्षक प्रा. कल्पेश बोटके यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT