कोकण

रत्नागिरी जिल्ह्याचे लवकरच विभाजन

CD

रत्नागिरी जिल्ह्याचे लवकरच विभाजन
स्वतंत्र मंडणगड जिल्हा; २६ जानेवारीला घोषणा?
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : राज्यात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड हा स्वतंत्र जिल्हा घोषित होण्याची शक्यता आहे.
२६ जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० ला झाली. त्या वेळी राज्यात फक्त २५ जिल्हे होते. नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रशासनिक गरजांमुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. २०१४ ला ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला होता. २०१८ मध्ये राज्य सरकारच्या समितीने २२ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता. सध्याच्या प्रस्तावात त्यापैकी बहुतेक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड आणि लगतच्या रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड हा नवीन जिल्हा स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. अर्थात, हा प्रस्ताव जुना असून त्याची अंमलबजावणी कधीपासून होते याकडे लक्ष लागले आहे.
--
शासनाकडून अधिकृत काही नाही
याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत आमच्याकडे अधिकृत काहीच आलेले नाही. शासनस्तरावर याचा निर्णय होणार आहे. विभाजनाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी गेला आहे. आमच्या काळातील हे प्रस्ताव नाही.
------
प्रस्तावित नवीन २१ जिल्हे
भुसावळ (जळगाव), उदगीर (लातूर), अंबेजोगाई (बीड), मालेगाव (नाशिक), कळवण (नाशिक), किनवट (नांदेड), मीरा-भाईंदर (ठाणे), कल्याण (ठाणे), माणदेश (सांगली/सातारा/सोलापूर), खामगाव (बुलडाणा), बारामती (पुणे), पुसद (यवतमाळ), जव्हार (पालघर), अचलपूर (अमरावती), साकोली (भंडारा), मंडणगड (रत्नागिरी), महाड (रायगड), शिर्डी (अहमदनगर), संगमनेर (अहमदनगर), श्रीरामपूर (अहमदनगर), अहेरी (गडचिरोली).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निधी मंजुरीसाठी मागितली लाच, ६ लाखांची रोकड स्वीकारताना मंत्रालयातला अधिकारी अडकला सापळ्यात; खारघरमध्ये रंगेहाथ पकडलं

SRH vs LSG: २६ वर ४ विकेट्स... शमी ऑन फायर! दोन चेंडूवर अभिषेक शर्मा अन् ट्रॅव्हिस हेडला धाडलं माघारी; इशानही स्वस्तात बाद, Video

अफेअरबद्दल सांगितलं तेव्हा काय होती पियुष मिश्रा यांच्या पत्नीची प्रतिक्रिया? म्हणाले, 'ती म्हणाली की...'

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लाच घेताना मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक

'मी आणि गुलजार यांनी एकमेकांना शॉर्टमध्ये जास्त बघितलंय' जुन्या ट्रोलिंगवर उत्तर देताना नीना गुप्ता म्हणाल्या...'टेनिससाठी आम्ही...'

SCROLL FOR NEXT