rat17p3.jpg
P25N39236
- खेड ः अथांग यश फाउंडेशन इंडियाच्यावतीने मान्यवरांचा सन्मान करताना पदाधिकारी.
अथांगतर्फे विविध क्षेत्रात सहभागी होणार
डॉ. गणेश मोरे ः खेडमध्ये मराठी भाषा अभिमान सोहळा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १८ ः भविष्यात फाउंडेशनच्या माध्यमातून कला, क्रीडा, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि साहित्य अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करणार असून, महिला बालकल्याण आणि रोजगार याबाबत मार्गदर्शक शिबिरे व विविध उपक्रम राबवणार असल्याचे अथांग यश फाउंडेशन इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश मोरे यांनी सांगितले.
अथांग यश फाउंडेशन इंडियातर्फे अभिजात मराठी भाषा अभिमान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम खेड येथील हॉटेल सौरभच्या सभागृहात झाला. या वेळी माजी नगराध्यक्ष आबा जोशी, मनोज जाधव, भाजप तालुका सचिव शशांक सिनकर, उदय बोरकर, दिनेश पोफळकर, विनोद कांबळे आदी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. मोरे यांनी अडीच हजार वर्षापूर्वी अवगत असलेल्या भाषांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच मराठी भाषेच्या सन्मानार्थ त्यांनी स्वतः मराठी भाषेत लिहिलेल्या व प्रकाशित झालेल्या बदलले रंग जीवनाचे या पुस्तकाची भेट देऊन मान्यवरांचा सत्कार केला. ही संस्था पूर्णपणे सामाजिक सेवा आणि त्याकरिता प्रत्येकाला योग्य असे मार्गदर्शन व सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.