कोकण

विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा

CD

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून
बांधला बंधारा
साडवली ः देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पाटगाव ग्रामपंचायतीतर्फे पाटगाव येथे सांब मंदिराजवळ वनराई बंधारा बांधण्यात आला. ५७ स्वयंसेवकांनी यासाठी योगदान दिले. या उपक्रमास सरपंच ज्योती गोपाळ, उपसरपंच रूपेश जाधव यांनी श्रमदान केले. या बंधाऱ्यामुळे जवळच्या दोन वाड्यांना मुबलक पाण्याची सोय मे महिन्यापर्यंत होईल, असे गावचे सरपंच ज्योती गोपाळ यांनी सांगितले. बंधाऱ्याचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच कार्यक्रम अधिकारी सुनील सोनावणे यांनी बंधारा बांधण्यात योगदान दिले.
---
लांजा महाविद्यालयात
सायबर क्राईमवर मार्गदर्शन
लांजा ः सायबर क्राईम तसेच मोबाईलचे फायदे-तोटे या संदर्भात लांजा पोलिस ठाण्यामार्फत मार्गदर्शन कार्यक्रम लांजा कनिष्ठ महाविद्यालयात झाला. पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, महिला पोलिस अंमलदार जगताप यांनी मार्गदर्शन केले. सायबर क्राईम व होणारे तोटे, महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत, शालेय जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणी, मोबाईलचा वापर, उपयोग व त्याचे फायदे तोटे, डायल ११२ अत्यावश्यक मदत केंद्र आदी विविध विषयांसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
---
मालदोलीत राष्ट्रसाधक
शिबिराचे आयोजन
चिपळूण ः विवेक व्यासपीठ, श्री संत मुक्ताई ज्ञानपीठ आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी जिल्हा यांच्या सहयोगातून ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्र साधक निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तीमार्गाची कास धरून उपासना तसेच साधना करताना त्याला राष्ट्रसेवेची जोड मिळावी. आध्यात्मिक बैठकीतून प्राप्त होणारे आत्मिक बळ सामाजिक कार्यात उपयुक्त व्हावे, या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर मालदोली येथील रामचंद्र वासुदेव मराठी न्यास येथे होईल. २० वर्षावरील कोणीही युवक, युवती यात सहभागी होऊ शकतील. शिबिराच्या अधिक माहितीसाठी विनय सराफ, धनंजय चितळे, किरण दुधाणे यांच्याशी संपर्क साधावा.
---
सती स्कूलमध्ये
राज्य क्रीडादिन
चिपळूण ः सती-चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ऑलिंपिकवीर स्व. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य क्रीडादिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात प्रांजल आंबेडे याने प्रथम, वीर मेटकर याने द्वितीय, आर्यन देसाई याने तृतीय क्रमांक मिळवला तर मुलींमध्ये अनुक्रमे प्रांजल खरात, श्रुतिका शिगवण, रोशनी खरात यांनी यश मिळवले. या निमित्त स्व. खाशाबा जाधव यांचे क्रीडाक्षेत्रातील योगदान या विषयी माहिती सांगणारे भित्तीपत्रकाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ लिपिक कल्पना पवार यांच्या हस्ते झाले. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय दरेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT