39247
कौशल्याधिष्ठीत विद्यार्थी घडवणे हेच रिगलचे ध्येय
संजयराव शिर्के ः राष्ट्रीय व राज्यस्तरावर चमकलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः तालुक्यातील कोंढे येथील रिगल एज्युकेशन सोसायटी संचालित रिगल पब्लिक स्कूलमध्ये योगा, तायक्वांदो, स्केटिंग, स्विमिंग आदी स्पर्धांमधील राष्ट्रीय व राज्यस्तरीय विभागात चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कौशल्याधिष्टीत सर्वांगीण विद्यार्थी घडवणे हेच रिगलचे ध्येय असल्याचे संस्थेचे चेअरमन संजयराव शिर्के यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के, संगीता पालकर यांच्यासह पालकसंघाचे प्रतिनिधी व मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत झाले. मुख्याध्यापकांनी वार्षिक अहवाल वाचनात शाळेच्या अतुलनीय कामगिरीवर प्रकाश टाकला. आजपर्यंत येथील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील स्पर्धांत सहभागी होत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.
संपूर्ण कार्यक्रम हा राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य डोळ्यासमोर ठेवून देशातील विविध प्रांतामधील लोकनृत्याचे प्रदर्शन केले. लोकनृत्यावर आधारित महाराष्ट्रातील विविध सणांवर आधारित नृत्य, विविध राज्यातील, गुजराती, तमिळ, पंजाबी, नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाची थीम ही लोकनृत्य होती. विद्यार्थ्यांनी देशातील विविध प्रांतातील, विविध भाषांचे प्रातिनिधिक नृत्यप्रकार अर्थात लोकनृत्य सादर केले.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.