अशोक लोटणकरांच्या
पुस्तकाचे प्रकाशन
रत्नागिरी ः संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी येथील लेखक अशोक लोटणकर यांच्या २१ व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. निराधार हा २५ कथांचा कथासंग्रह अमित प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या कथासंग्रहास प्राचार्य आणि समीक्षक दत्ता पवार यांचा अभिप्राय लाभला आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेल्या कथांमध्ये माणसांचे वास्तव दिसते, अशा शब्दात पवार यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. या सगळ्या कथा यापूर्वी विविध मासिके आणि दिवाळी अंकांमधून पूर्वप्रकाशित झाल्या आहेत. लोटणकर यांनी ललित गद्याबरोबरच काव्य, कथा, लघुकथा, बालसाहित्य, समीक्षा अशा साहित्यप्रकारात लेखन केले आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी त्यांची काही पुस्तके ब्रेललिपीतही प्रसिद्ध झाली आहेत. लोटणकर यांना कोमसाप साहित्य पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार असे प्रतिष्ठेचे २५हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
---
श्रावणी देवळेकर,
सांची कांबळेचे यश
साखरपा : रेखाकला परीक्षांच्या निकालात दाभोळे येथील माध्यमिक विद्यालय दाभोळे शाळेतील श्रावणी देवळेकर आणि सांची कांबळे या विद्यार्थिनींनी ए ग्रेड मिळवली. कला आणि संचालनालयातर्फे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्ही परीक्षांचा निकाल संचालनालयाने जाहीर केला आहे. एलिमेंटरी परीक्षेत शाळेचे २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सांची कांबळे या विद्यार्थिनीने ए ग्रेड मिळवली आहे. १३ विद्यार्थ्यांनी बी ग्रेड मिळवली आहे. इंटरमिजिएट परीक्षेत ५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी श्रावणी देवळेकर हिने ए ग्रेड मिळवली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.