rat१७p२९.jpg-
P२५N३९३६१
ममता जोशी
---------
पोमेंडीच्या सरपंचांना दिल्लीचे निमंत्रण
प्रजासत्ताक दिनी परेडवेळी विशेष अतिथीचा मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८: राजधानी असलेल्या दिल्ली येथे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्याचा मान तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता अंकुश जोशी यांना मिळाला आहे. राज्यातून प्रत्येक जिल्ह्यामधून एका सरपंचांची निवड करण्यात आली असून, विविध कामगिरीचा आढावा घेत ही निवड झाली आहे. त्याबद्दल जोशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, राज्याच्या पंचायतराज विभागाच्या संचालकांनी ही निवड केली आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा गावपातळीवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन ही निवड करण्यात आली आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून ३४ सरपंच विशेष अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडला दिल्लीमध्ये उपस्थित राहण्याचा मान केंद्र शासनाने दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरी नजीकच्या पोमेंडी बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता अंकुश जोशी यांची निवड झाली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.