swt183.jpg
39468
कुडाळः फ्रेंडशिप संघाच्या सुमित डोंगरे याला सामनावीरने गौरविताना कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरविंद शिरसाट.
''फ्रेंडशिप चेंदवण''चा
१०३ धावांचा डोंगर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः येथील क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या प्रिन्स समादेवी मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ आयोजित आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवशी फ्रेंडशिप चेंदवण संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. षटकार-चौकारांची फटकेबाजी करत फ्रेंडशिप चेंदवणने सहा षटकांत १०३ धावांचा डोंगर उभा केला.
तिसऱ्या दिवशी पहिला सामना टीटीएमएम कुडाळ व क्रीडा संकुल ओरोस यांच्यामध्ये झाला. यामध्ये क्रीडा संकुल ओरोस संघ विजयी ठरला. या संघाचा मंगेश सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दुसरा सामना मॉर्निंग स्टार कुडाळ व रजा इलेव्हन यांच्यामध्ये झाला. या सामन्यामध्ये रजा इलेव्हन संघ विजयी झाला. या संघाच्या राजाराम याने सामनावीर किताब पटकावला. तिसरा सामना फ्रेंडशिप चेंदवण व ओम इलेव्हन कुडाळ यांच्यामध्ये झाला. फ्रेंडशिप चेंदवणने बबल नाईकच्या ३४ व दाजी नाईक यांच्या ३५ धावांच्या जोरावर १०३ धावांचा डोंगर उभारला. ओम इलेव्हन संघ ३० धावांपर्यंत मजल मारू शकला. बबल नाईक सामनावीर ठरला.पु ढील सामना डॅझलिन म्हापसा व दशावतार योद्धा यांच्यात झाला. दशावतार योद्धा संघ विजयी होऊन अमित झोरे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. फ्रेंडशिप चेंदवण व क्रीडा संकुल ओरोस यांच्यात झालेल्या सामन्यात चेंदवण संघ विजयी झाला. गोपाळ बटा सामनावीर ठरला. दिवसभरातील शेवटचा सामना फ्रेंडशिप चेंदवण व दशावतार योद्धा यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना फ्रेंडशिपने गोपाळ बटा २८ व सुमित डोंगरे यांच्या ४२ धावांच्या जोरावर सहा षटकांत ७७ धावा जमवल्या. दशावतार योद्धा संघाने धावांचा पाठलाग करताना सुरुवात छान केली; मात्र शेवटच्या दोन षटकांत २४ धावांची आवश्यकता असताना सुरेख गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवून फ्रेंडशिप संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.