कोकण

शिष्यवृत्ती सराव परीक्षेस खारेपाटण शाळेत प्रतिसाद

CD

wt184.jpg
39469
खारेपाटण : शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा प्रारंभ करताना प्राप्ती कट्टी, गुरुप्रसाद शिंदे, मंगेश ब्रम्हदंडे, मंगेश मुद्रस आदी. (छायाचित्र ः एन. पावसकर)

शिष्यवृत्ती सराव परीक्षेस
खारेपाटण शाळेत प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सिंधुदुर्ग यांच्यावतीने पूर्व उच्च प्राथमिक जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०२५ चा प्रारंभ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, खारेपाटण नं. १ येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
तळेरे प्रभागातील खारेपाटण व शेर्पे या दोन केंद्रांतील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी खारेपाटण केंद्रशाळेत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे केंद्र घेण्यात आले होते. प्राथमिक शिक्षक समिती राज्यस्तरीय प्रतिनिधी मंगेश मुद्रस, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, केंद्रशाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, मुख्याध्यापक प्रदीप श्रवणकर, शिक्षक संदीप कदम, केंद्रशाळा, शेर्पेचे शिक्षक तुषार तांबे, कुरंगवणे शाळेचे शिक्षक राजू गर्जे, शिडवणे नं. १ शाळेचे शिक्षक दीपक काळेल, चिंचवली शाळेचे पालक दत्तात्रय भालेकर आदी उपस्थित होते. पाटणकर यांनी शिक्षक समितीच्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी चांगले काम करत असल्याबद्दल आभार व्यक्त केले. अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांनीही शुभेछा दिल्या. सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्रावणकर यांनी केले. आभार शिक्षिका राऊत यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT