कोकण

कुडाळात आज ''गुणगुण गाणी''

CD

कुडाळात आज
‘गुणगुण गाणी’
कुडाळः नाद संगीत अॅकॅडमीतर्फे सिंधुदुर्ग येथे आयोजित आठवणींना उजाळा देणारा ‘गुणगुण गाणी’ हा नृत्याविष्कार कार्यक्रम उद्या (ता. १९) सायंकाळी ७ वाजता येथील मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अॅकॅडमीचे संचालक आदित्य आचरेकर, गोपाळ परब यांची असून कार्यक्रमाचे लेखक डॉ. राजेंद्र चव्हाण, दिग्दर्शक अभिषेक गवंडे आहेत. नृत्य मार्गदर्शन संकल्प क्रिएशन, कुडाळचे भूषण बाक्रे यांचे आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
...............
कुडाळ येथे आज
वर्धापन सोहळा
कुडाळः अयोध्येतील श्रीराम मंदिर स्थापना दिनाचे औचित्य साधून नूतनीकरण केलेल्या श्री देव रवळनाथ मंदिराचा प्रथम वर्धापनदिन सोहळा बुधवारी (ता. २२) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता लघुरुद्र, दुपारी १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता महापूजा, सायंकाळी ५ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ८ वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर (संचालक, भाईकलिंगण) यांचे ‘ट्रिकसिन’युक्त नाटक ‘मेहंदीपुरचा बालाजी’ अर्थात ‘सूडाग्नी’ सादर होणार आहे. सर्व नाट्यरसिक व भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.
...............
म्हापण ग्रामपंचायतीतर्फे
मोफत एक्स-रे तपासणी
म्हापणः राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत मोहिमेत आयुष्मान आरोग्य मंदिर, परुळे बाजार ग्रामपंचायत येथे मोफत एक्स-रे तपासणी कार्यक्रम झाला. यावेळी जोखीमग्रस्त गटातील लाभार्थ्यांची चेस्ट एक्स-रे तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे अमित गंगावणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश जाधव, नितीन नाईक, सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, पोलिसपाटील जनार्दन पेडणेकर, सदस्य प्रदीप प्रभू, प्राथमिक आरोग्य केंद्र, परुळेचे आरोग्य सहायक नागेश तोरसकर व सत्यवान मठकर, आरोग्य समुदाय अधिकारी वैष्णवी पाटकर, काजल परब, आरोग्यसेवक एस. आर. चव्हाण, मनोज दुधवडकर, आशा स्वयंसेविका कोमल मांजरेकर, रक्षित गोवेकर, राजलक्ष्मी परुळेकर, मदतनीस आरती परुळेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ७० लाभार्थ्यांची एक्स-रे तपासणी करण्यात आली. यावेळी ‘क्षयमुक्त भारत’ची शपथ घेण्यात आली.
..............
तळेरे व्यापारी संघाचा
आज वर्धापन दिन
तळेरे : येथील आदर्श व्यापारी संघटनेचा ६८ वा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. १९) विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ८.३० वाजता ‘श्रीं’ची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, ११ वाजता श्री गांगेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे-गावठाणचे बुवा संतोष तळेकर यांचे भजन, दुपारी २ वाजता हळदी-कुंकू, ३.३० वाजता श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, पाचल-राजापूरचे बुवा तेजस नारकर व विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, पुरळ-देवगडचे बुवा प्रवीण सुतार यांचा २०-२० भजनाचा सामना रंगणार आहे. सायंकाळी ५ वाजता यशस्वी उद्योजक, उत्कृष्ट कार्यकर्ता, उत्कृष्ट सामाजिक संस्था पुरस्कारांचे वितरण होईल. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, सहकार्यवाह चंद्रकांत जठार, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच रिया चव्हाण उपस्थित राहणार आहेत. रात्री ८ वाजता वामनराव महाडिक विद्यालयाची ‘आये’ ही एकांकिका, त्यानंतर मालवणी नाटक ‘गावय’ सादर होईल. उपस्थित राहण्याचे आवाहन तळेरे व्यापारी संघटनेने केले आहे.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

SCROLL FOR NEXT