39470
विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचे दर्शन
कणकवलीतील ‘अविम’ उपक्रमः विजेत्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ : एस. ए. ई. इंडिया आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांच्यावतीने ‘अ वर्ल्ड इन मोशन (अविम)’ या शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या ‘जेट टॉय’ स्पर्धेत प्रगत विद्या मंदिर रामगडने प्रथम, विद्या मंदिर हायस्कूल कणकवलीने द्वितीय क्रमांक पटकावला. ‘स्कीमर टॉय’ प्रकारात असरोंडी माध्यमिक शाळा प्रथम, द्वितीय क्रमांक विद्या मंदिर हायस्कूल कणकवलीने मिळविला.
कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली संशोधनवृत्ती आणि कल्पकतेचे अनोखे दर्शन घडविले. स्पर्धेतील प्रथम विजेते संघ पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कंज्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष भूषण वाडेकर, ल. गो. सामंत, शालेय समिती सदस्य सचिन घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे स्वयंसेवक समीर वंजारे, समीर माडये, संजय मालप, रुपेश मोरये उपस्थित होते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इंजिनियरींगची आवड निर्माण व्हावी व शैक्षणिक प्रगतीसाठी महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक सुबोध मोरये यांनी हा उपक्रम कोकणातील शाळांसाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. पाचवी व सहावीच्या विदयार्थ्यांसाठी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सारख्याच प्रमाणात पुरविल्या गेलेल्या साहित्याच्या माध्यमातून स्कीमर व जेय टॉय करण्याची स्पर्धा झाली. तयार केलेल्या प्रकल्पांची त्यांच्या अधिकतम क्षमतांच्या मूल्यमापनाच्या आधारे निवड करण्यात आली. त्यात अधिकाधिक अंतर चालणे, वजन वाहून नेणे, ठरलेल्या ठिकाणी थांबणे, वळण घेणे, जलद गतीने चालणे अशा चाचण्या व भविष्यातील इंजिनियरींगमधील आव्हाने, त्यावरील इनोव्हेटिव्ह आयडिया यांचा समावेश होता. या उपक्रमात एकूण २० शाळांनी सहभाग घेतला. यांना शिक्षक आणि महिंद्राचे स्वयंसेवकांचे मार्गदर्शन मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.