कोकण

''डी.एड्. कट्टा''चे सवंगडी रमले आठवणींत

CD

39471

‘डी.एड्.कट्टा’चे सवंगडी रमले आठवणींत
स्नेहमेळावा उत्साहात ः गुरुजनांसह सेवानिवृत्तांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः शिक्षणमहर्षी कै. डी. बी. ढोलम संचलित डी. एड. कॉलेज कट्टाच्या १९८७-८८ च्या बॅचचा स्नेहमेळावा ''जिव्हाळा'' कट्टा येथील माडये हॉलमध्ये उत्साहात झाला. ''सर्वांना आनंद द्या आणि घ्या'' या थीमवर आधारित ३५ वर्षांनंतरच्या तिसऱ्या स्नेहमेळाव्यात ५० बॅचमेट एकत्र येत विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा दिला.
धुळे, नाशिक, सांगली, रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्ग येथील शिक्षक मित्र-मैत्रिणी एकत्र आले. त्याकाळात प्रतिकूल परिस्थितीत डी.एड्. पूर्ण करून कुटुंबासाठी नोकरी मिळविणे फारच अवघड गोष्ट होती; मात्र तत्कालीन विभागीय निवड मंडळाच्या माध्यमातून सर्वजण शिक्षक म्हणून नोकरीला लागले. तेव्हापासून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडविल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.
(कै.) ढोलम यांना आदरांजली वाहत ''हीच अमुची प्रार्थना'' या गीताने स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली. सुसंस्कारित शिक्षणाने विद्यार्थ्यांना घडवित सामाजिक बांधिलकीने समाजात कार्यरत राहत समाज घडविण्याचे कार्य याहीपुढे सुरू ठेवा. शिक्षक हा समाजाला आदर्श असतो, तो आदर्श कायम ठेवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षकांनी केले. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन समाज उद्बोधनासाठी व्यतित करून सदैव कार्यरत राहा, असेही मत मांडण्यात आले. यावेळी निवृत्त केंद्रप्रमुख वासुदेव मराठे, मुख्याध्यापक भालचंद्र जोईल, अरुण होडावडेकर, विद्या पराडकर-म्हसकर, वनिता मुंडले-सबनीस, अमृत काटे, रमेश सिसाळे, महादेव गुरव आदी सात जणांचे निवृत्तीपर सत्कार करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना सुसंस्कारित घडविण्याचे कार्य आमच्या हातून घडले. निवृत्तीनंतरही प्रबोधनाचे काम कायम सुरू ठेवू, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
या स्नेहमेळाव्याला सिंधुदुर्गमधून सुधीर जोशी, अरुण कदम, राजन हजारे, बबन देवरुखकर, कविता धुरी, प्रदीप सावंत, नितीन जठार, मंगेश मुद्रस, दिलीप पिंगुळकर, चंद्रकांत पांगम, मनीषा पाटकर, स्नेहलता तावडे-साटम, रोजमारी फर्नांडिस-डिसा, मंजिरी गांगनाईक-रांजणकर, शुभांगी त्रिंबककर-आजगावकर, शिवराम सुतार, दयानंद गवस, गीता धुरी, पुष्पलता परुळेकर, स्नेहल सावंत-माणगावकर, प्रतीक्षा सावंत, गीता नाईक, उषा तुळसकर-दांडेकर, मिनल जोशी तसेच कोल्हापूर, सांगली, नाशिक, धुळेमधून अमृत काटे, बाबुराव गुरव, बाळकृष्ण तुपारे, रमेश पाटील, राजाराम पाटील, शिवाजी पाटील, सुधाकर सोनार, नारायण पाटील, रमेश पाटील, विजय कोळी, महादेव गुरव, एकनाथ वरेकर, नामदेव गुरव, संजय बागुल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दादा जांभवडेकर व सुगंधा माईणकर-जोशी यांनी केले.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT