कोकण

सातोळीतील बेकायदेशीर पोलिस चेकपोस्ट हटवा

CD

सातोळीतील बेकायदेशीर
पोलिस चेकपोस्ट हटवा
जयंत बरेगारः अधीक्षकांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः खासगी वाहनावर पोलिस चिन्ह व ब्रीदवाक्य लावून त्याचा गैरवापर पोलिस कर्मचाऱ्यांकडून केला जात असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केली आहे. तसेच सातोळी येथे बेकायदेशीररित्या झोपडे बांधून पोलिस बॅरिकेट लावून चेकपोस्ट असल्याचा आभास केलेला आहे. पोलिस खात्याने तयार केलेली ही बेकायदेशीर झोपडी त्वरित काढावी; अन्यथा या झोपडीच्या बाजूला झोपडी बांधून राहायला सुरुवात करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बरेगार यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पोलिस कर्मचारी आपल्या खासगी वाहनावर पोलिस चिन्ह व ब्रीदवाक्य लावून गैरवापर करतात. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली असता उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी करून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत; मात्र असे असतानाही हा प्रकार सुरूच आहे. कर्मचारी तुटवडा असल्याचे कारण नमूद करून बंद करण्यात आलेला सातोळी पॉईंट येथील बेकायदेशीर चेकपोस्ट कोणतीही पोलिस भरती झालेली नसताना पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. हा बेकायदेशीर चेकपोस्ट व तेथे बांधण्यात आलेली झोपडी त्वरित काढून टाकावी; अन्यथा या झोपडीच्या बाजूला मी झोपडी बांधून राहायला सुरुवात करेन. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेला पोलिस खाते जबाबदार असेल, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५ % वाढ होणार ? मोठी अपडेट समोर

Nashik Mhada Scam : तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर अन् बनावट कागदपत्रे; नाशिकमधील 'त्या' ४९ प्रकल्पांचे बिंग फुटले

Rohit Sharma Video: 'भाऊ तू फक्त फिल्डिंग कर...', रोहितने 'कच्चा लिंबू' खेळाडूबद्दल मराठीतून ऐकवला मजेशीर किस्सा

Summer Body Heat: उन्हाळ्यात सतत तळपायांची जळजळ, छातीत आग जाणवते? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; लगेच जाणवेल फरक

Solapur Fertilizer Price Hike: युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता; खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होणार बंद

SCROLL FOR NEXT