

Rohit Sharma childhood cricket story
Sakal
मुंबई क्रिकटने नुकतीच मोठी घोषणा केली. टी-२० मुंबई लीगचा (T20 Mumbai) चौथा सिझन पुन्हा सुरू होणार आहे, यासोबतच पहिल्यांदाच टी-२० मुंबई महिला लीगही सुरू करण्यात येणार आहे. या स्पर्धांच्या ट्रॉफीचं अनावरण भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हस्ते रविवारी (१५ मार्च) मुंबईत झाले.
या सोहळ्यासाठी मुंबई आणि भारतीय संघातील खेळाडू सायली सतघरे, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि माजी एमसीए अध्यक्ष आशिष शेलार तसंच लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान रोहित शर्माने त्याच्या काही आठवणी आणि किस्सेही सांगितले. विशेष म्हणजे रोहित या कार्यक्रमात मराठीत बोलत होता.