-rat१८p७.jpg
२५N३९४८१
- राजापूर ः मार्गदर्शन करताना हिंदू जनजागृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनय पानवळकर.
-------------------
हिंदू राष्ट्र स्थापनेमुळे विश्वकल्याणही
साधले जाईल ः विनय पानवळकर
ःताम्हाणेत हिंदू जनजागृती समितीतर्फे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ : आमचे धर्मपुरुष हे राष्ट्रपुरुषच आहेत आणि राष्ट्रपुरुष धर्म पाळणारे आहेत. आम्ही देवतांच्या चरणांची पूजा करतानासुद्धा या राष्ट्राला बळ प्राप्त होवो, असा मंत्र म्हणतो. धर्माचे सारे मंत्र केवळ राष्ट्र कल्याणाचेच नव्हे तर विश्वकल्याणाचेही आहेत. त्यामुळे हिंदू राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्र कल्याणासह विश्वकल्याणही साधले जाईल, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनय पानवळकर यांनी केले.
तालुक्यातील ताम्हाणे येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पानवळकर बोलत होते. आदिनाथ भागवत संप्रदायाचे अध्यक्ष दिगंबर महाराज चव्हाण, संतोष महाराज चव्हाण, चिंतामणी रबसे आदी उपस्थित होते. विनय पानवळकर यांनी जीवनातील धर्माचरणाचे महत्व साऱ्यांसमोर विषद केले. पुरुषांनी टिळा लावणे, महिलांनी कुंकू लावणे, तिथीनुसार वाढदिवस साजरा करणे, हस्तांदोलनाऐवजी हात जोडून नमस्कार करणे आदी हिंदू धर्मातील छोट्या-छोट्या कृती आचरणात आणल्यास होणारे लाभ पानवळकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून साऱ्यांसमोर सविस्तरपणे मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.