कोकण

मंडणगड न्यायालय इमारतीच्या कामांचा आढावा

CD

-rat१८p५.jpg
P२५N३९४७९
-मंडणगड ः दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीची पाहणी करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.
------------
न्यायालय इमारतीच्या कामांचा आढावा
न्यायाधिश गोसावी यांनी केली पाहणी ; १५ ऑगस्टपर्यंत तयार होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ ः मंडणगड दिवाणी न्यायालयाची पूर्णत्वास जात असलेल्या नवीन इमारतीचे बांधकाम व अन्य सुविधांची पाहणी रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली.
या वेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक विजय चव्हाण, प्रांताधिकारी अर्चना बोंबे, तहसीलदार अक्षय ढाकणे, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमरदीप रामसे आदी उपस्थित होते.
मंडणगडमध्ये ८ ऑक्टोबर २०२३ ला प्रथमच दिवाणी न्यायालय सुरू करण्यात आले. या न्यायालायासाठी सुसज्ज अशी स्वमालकीची इमारत असावी, यासाठी जागेची उपलब्धता करून त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते या नवीन इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगाव असलेल्या मंडणगड तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या न्यायालयाची नवीन प्रशस्त इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. एकूणच या इमारतीसंदर्भात आढावा व पाहणी दरम्यान जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश यांनी मंडणगड येथे प्रत्यक्ष न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या ठिकाणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थित भेट दिली. पाहणीनंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, १५ ऑगस्ट पर्यंत न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT