कोकण

सोमेश्वर नगरीत परमेश्वराचा विवाह सोहळा

CD

-rat१८p१८.jpg-
२५N३९५२७
संगमेश्वर ः मठधामापूर येथील सोमेश्वर नगरीत झालेला सोमेश्वर-गिरिजादेवीचा विवाह सोहळा.
----------
सोमेश्वर नगरीत परमेश्वराचा विवाह सोहळा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १८ ः संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर येथील श्री देव सोमेश्वर देवस्थान विशेष प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षाप्रमाणे येथे सोमेश्वर-गिरिजा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात येथील मानकरी, यजमानी व हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला.
दरवर्षी मकरसंक्रांतीला या मंदिराचा वार्षिक उत्सव मोठ्या थाटात साजरा होत असतो. या उत्सवात संक्रांतीच्या दिवशी देवी गिरिजा आणि श्री देव सोमेश्वर यांचा विवाह (कल्याण) सोहळा महत्वाचा व भक्तगणांसाठी लक्षवेधी ठरतो. ११ जानेवारीला कोल्हापूर-कणेरीमठ येथील काडसिद्धेश्वर महाराज यांचा सत्संग सोहळा झाला. १२ जानेवारीला रात्री ८ वा. स्थानिक मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, १३ जानेवारीला रात्री कुडाळ येथील दशावतार कार्यक्रम झाला. दरवर्षी हा कल्याण सोहळा १५ जानेवारीला येतो. अनेक वर्षानंतर यावर्षी तो एक दिवस अगोदर म्हणजे १४ जानेवारीला आला. या दिवशी मंदिरात सकाळी ६ ते ७ वा. पूजा, आरती, अभिषेक, १० ते दुपारी १ वा. भावगीत व भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम झाला तर दुपारी २.३० वा. सोमेश्वर गिरिजा विवाहसोहळा, दुपारी ४ वाजता हळदीकुंकू, रात्री ९ ते ११ कीर्तन, १५ जानेवारीला सायंकाळी ४.३० ते रात्री देवीचा गोंधळ, १६ जानेवारीला सकाळी ८ ते २ अभिषेक, उद्यापन व सायं. ५ ते १० महाप्रसादाने वार्षिक उत्सवाचा समारोप झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चाळीतली खोली ते 2BHK फ्लॅट! BDDवासियांना मिळाल्या नव्या घरांच्या चाव्या, ८६४ रहिवाशांची स्वप्नपूर्ती

चाबहार पोर्टजवळ अमेरिकेचे हल्ले, लढाऊ विमानातून बॉम्ब फेकल्यानं विध्वंस; भारतासाठी हे महत्त्वाचं बंदर

दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

Success Story : वडिलांचं सलूनचं दुकान, लेक बनला पीएसआय कवठेपिरानच्या ओंकार जाधवची ‘एमपीएससी’ परीक्षेत बाजी

IPL : विराट कोहलीने निवडली RCB ची आवडती प्लेइंग इलेव्हन; अनिल कुंबळेसह स्टार्क-चहललाही संधी

SCROLL FOR NEXT