दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

Indians Arrested in UAE: युनायटेड अरब अमिरातीत युद्धजन्य स्थितीत दिशाभूल करणारे व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी १९ भारतीयांसह ३५ जणांना अटक करण्याचे आदेश जारी केले आहेत. सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Dubai Drone Attack

UAE Cracks Down After Dubai Drone Incident

Esakal

Updated on

Dubai Drone Attack: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरात तणाव निर्माण झाला आहे. आखाती देशही या युद्धामुळे संकटात सापडले आहेत. इराण सातत्यानं दुबईसह युएईतील अनेक शहरांवर हल्ले करत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतर उड्डाणं अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी विमानतळाजवळ आग लागल्याच्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमान उड्डाणे बंद केली. दरम्यान, सोशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडीओ आणि फोटो शेअर करणाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात येत आहे. चुकीचे व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी १९ भारतीय नागरिकांसह ३५ जणांना अटक करण्याचे आदेश युएई सरकारने दिलेत. UAE Arrests 35 People Including 19 Indians Over Viral Misleading Videos

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com