कोकण

''सर्वोत्कृष्ट'' पुरस्काराने ''कोकण'' संस्थेचा सन्मान

CD

swt1814.jpg
39562
मुंबई : पुरस्कार स्वीकारताना संस्थाध्यक्ष दयानंद कुबल आणि प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे.

‘सर्वोत्कृष्ट’ पुरस्काराने
‘कोकण’ संस्थेचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ः महिला आणि बालकल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण संस्थेला भारतातील सर्वोत्कृष्ट संस्था या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा ब्रेनलिटिक्स या कंपनीच्या वतीने आज मुंबईच्या हॉटेल रेडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. संस्थाध्यक्ष दयानंद कुबल व प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे यांनी हा सन्मान स्वीकारला.
कोकण संस्था गेली १३ वर्षे महिलांच्या आणि मुलांच्या प्रश्नांवर काम करत आहे. रायगड जिल्हा बालविवाह मुक्त व्हावा, यासाठी ‘एक्सेस टू जस्टीस’ या संस्थेबरोबर कार्यरत आहे. देशपातळीवर अनेक प्रोजेक्ट चालवत असून ११ लाखांपेक्षा जास्त गरजू लाभार्थींना संस्थेच्या माध्यमातून मदत झाली आहे. संस्था ४३५ मुलांची सक्षम प्रोजेक्ट अंतर्गत संपूर्ण जबाबदारी घेते. रस्त्यावरील मुलांसाठी ''गल्ली स्कूल'' आणि आदिवासी पाड्यातील मुलांसाठी ''युवा किरण'' अशा सर्व प्रोजेक्टची दखल या निमित्ताने घेतली गेल्याचे मत कुबल यांनी व्यक्त केले. भारत सीएसआर आणि सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्ह आणि ॲवॉर्डस्‌ हा भारतामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्थांना शोधून त्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत गुढीपाडव्याचा उत्साह ; महिलांची भव्य बाईक रॅली

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT