कोकण

बौद्ध आयडेंटिटी ''धम्म स्वीकाराने प्राप्त झाली

CD

-ratchl१८४.jpg
२५N३९५५४
ः चिपळूण ः अपरांत संगिती विशेषांकाचे प्रकाशन करताना मान्यवर.
------
बौद्ध ओळख ‘धम्म’ स्वीकाराने
प्राप्त झाली ः प्रा. देवडेकर
महाडमध्ये तिसऱ्या सम्यक साहित्य संगितीचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः सामाजिक सुधारणा करणे आणि सामाजिक पुनर्रचना करणे या दोन भिन्न बाबी आहेत. त्या समजून घेतल्या पाहिजेत. शेकडो वर्षापूर्वी छिन्नविच्छिन्न झालेली आमची मूळ बौद्ध ओळख (आयडेंटिटी) धम्म स्वीकाराने आम्हाला पुन्हा प्राप्त झाली आहे. आता आम्ही सोडलेल्या धर्मातील रूढी-परंपराच्या सुधारणांच्या फंदात न पडता नव्या धम्माला साजेशा सामाजिक पुनर्बांधणीतून ही बौद्ध आयडेंटिटी प्रस्थापित करण्याची भूमिका जबाबदारीने बजवायला हवी, असे प्रतिपादन तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगितीचे अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर यांनी येथे केले .
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्यावतीने तिसरी सम्यक साहित्य कला संगिती महाड येथील गोपाळबाबा वलंकर साहित्यनगरी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे दोन दिवस आयोजित केली आहे. त्याचे उद्‍घाटन लेखक व विचारवंत प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष साहित्यिक ज. वी. पवार, सरचिटणीस सुनील हेतकर, रत्नागिरीचे अध्यक्ष संजय गमरे आदी उपस्थित होते.
प्रा. देवडेकर म्हणाले, बौद्ध आयडेंटीचे संवर्धन करणारी सृजनशीलता कार्यरत झाली तर महाडच्या या ऐतिहासिक क्रांती भूमीत संपन्न झालेली ही सम्यक साहित्य कलासंगिती भावी पिढ्यांसाठीही प्रेरक ठरेल. या निमित्त तुळशीराम जाधव, दीपेश भाऊ जाधव, अरूणा येलवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT