कोकण

लांजा -गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारी गाडी पकडली

CD

-rat18p16.jpg
39514
लांजा ः पोलिसांनी ताब्यात घेतलेली बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणारी गाडी.

जनावरांची बेकायदेशीर वाहतूक
करणारी गाडी रिंगणेकोंडला पकडली

शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे सोपवले

लांजा, ता. १८ ः जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणारी गाडी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी पकडून लांजा पोलिसांच्या ताब्यात दिली. ‌ही घटना रिंगणेकोंड या ठिकाणी शुक्रवारी १७ जानेवारीला दुपारी २.४५ वाजता घडली. यात वापरण्यात आलेली गाडी व दोन बैल असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर या प्रकरणी राजापूर तालुक्यातील दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेळ ते पाचल रोडवर बेकायदा व विनापरवाना जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार काल शुक्रवारी दुपारी सापळा रचण्यात आला होता. दुपारी २.४५ वाजण्याच्या दरम्याने व्हेळफाटा ते पाचलकडे जाणाऱ्या रोडवर रिंगणेकोंड या ठिकाणी गाडी (एमएच ०६, बीजी २८०१) थांबवण्यात आली. या गाडीच्या पाठीमागील हौद्यात दोन बैलांना चारापाण्याची व्यवस्था दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे गुरे वाहतुकीचा परवानादेखील नव्हता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. फिर्याद वेदांत विठ्ठल दळवी (वय २४, रा. आरगाव फौजदारवाडी) यांनी दिली. विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी नाझीम हुसेन फकीर (३५, रा. मूर मुस्लिमवाडी, राजापूर) आणि आजीम हुसेन फकीर (४२, रा. मूर मुस्लिमवाडी, राजापूर) या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत वापरण्यात आलेली २ लाख ५० हजार रुपयांची गाडी तसेच ३० हजारांचे दोन बैल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT