कोकण

वेर्ले धरणामुळे पर्यटनाला चालना

CD

swt1820.jpg
39593
वेर्लेः धरण प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. बाजूला सचिन वालावलकर, चंद्रकांत गावडे, अशोक दळवी, रामचंद्र धोत्रे व इतर.

वेर्ले धरणामुळे पर्यटनाला चालना
दीपक केसरकरः अॅडव्हेंचर स्पोर्टससाठी वापर होणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः वेर्ले येथील धरणामुळे परिसरातील बागायतदारांना मोठा फायदा होणार आहे. शिवाय धरणाचा उपयोगपर्यटन दृष्ट्या अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी होईल. धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अनेक पर्यटक या परिसरात येतील, असा विश्वास महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
वेर्ले येथील मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने वेर्ले येथे उभारण्यात येत असलेल्या धरण प्रकल्पाचे भूमिपूजन आज आमदार केसरकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता रामचंद्र धोत्रे, भूषण नार्वेकर, शाखा अभियंता सौरभ अहिर, आशुतोष यादव, जिल्हा नियोजन सदस्य सचिन वालावलकर, चंद्रकांत गावडे, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाध्यक्ष बबन राणे, कंत्राटदार प्रकाश पाटील, बाबासाहेब शिंदे, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, जीवन लाड, राजन रेडकर आदी उपस्थित होते.
आमदार केसरकर म्हणाले, "शिरशिंगे येथील बंद असलेला धरण प्रकल्प आता नव्याने सुरू होत आहे. या धरणाचा फायदा हा वेर्ले गावाला होणार आहे. हे गाव एका ठराविक उंचीवर आहे. त्यामुळे वेर्ले येथे मृद जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा धरण प्रकल्प उभा राहणार आहे. वेर्ले येथील हे धरण दहा कोटी रुपये खर्च करून मंजूर करण्यात आले आहे. हे धरण ३२५.०० मीटर उभारण्यात येणार असून त्यामध्ये ३०.४९ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र ५.८० चौ.कि.मी. इतके आहे. धरणातून सिंचन क्षेत्र २४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे."
ते पुढे म्हणाले, "वेर्ले येथील धरण प्रकल्पाचा फायदा पर्यटन वाढीसाठी होणार आहे. धरणाचा फायदा आंबोली परिसरातील अॅडव्हेचर स्पोर्ट्ससाठी होणार असून वेर्लेतील बागायतदारांना पाणी मिळणार आहे. त्यामुळे अधिकची जमीन ओलिताखाली येईल. येथील बागायतदारांना अनेक नवनवीन बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत.’’ उपविभागीय अभियंता धोत्रे यांनी धरण प्रकल्पाबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT