कोकण

बांदा बसस्थानकाच्या जागेची हद्द निश्चित करू

CD

बांदा बसस्थानकाच्या
जागेची हद्द निश्चित करू

‘एसटी’ची ग्वाही; धुरींचे उपोषण स्थगित

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने बांदा बसस्थानक परिसरात गैरव्यवहार करून खासगी जागेवर अतिक्रमण केले असून महामंडळाने आपल्या जागेची हद्द निश्चित करावी, यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांनी आज केलेले उपोषण सायंकाळी एसटी प्रशासनाच्या आश्वासनानंतर सोडले. मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा इशाराही धुरी यांनी प्रशासनास दिला.
यात एसटी प्रशासनाकडून केलेल्या जमिनीच्या मोजणीचा नकाशा आणि आवारात भाडे तत्वावर असणाऱ्या दुकानाच्या बाजूने कुंपण घालण्याची मागणी धुरी यांनी केली होती. ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. यावेळी सहायक वाहतूक अधीक्षक राजाराम राऊळ यांच्या आश्वासनानंतर उपोषण सोडले.
श्यामसुंदर धुरी यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, आपल्या जागेत अतिक्रमण केले आहे. संबंधित जागा महामार्गालगत असून बांदा बसस्थानकाला लागून आहे. ही जागा आपले काका सूर्यकांत धुरी यांच्या मालकीची आहे. मालकीची काही जागा एसटी महामंडळाच्या जागेत आहे. याबाबत वेळोवेळी हद्द ठरविण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे, मात्र याबाबत ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने हद्द ठरविण्यासाठी त्यांचे लक्ष वेधावे, यासाठी उपोषणाचा निर्णय घेतला. त्यानुसार आज उपोषणास बसले होते. उपोषणस्थळी पोलिस बंदोबस्त होता. उपोषणास सरपंच प्रियांका नाईक यांच्यासह अनेकांनी समर्थन दिले. सायंकाळी एसटी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत धुरी यांचे म्हणणे ऐकून घेतले. मागणीची येत्या काही दिवसांत पूर्तता करू, असे लेखी आश्वासन देताच धुरी यांनी उपोषण सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT