रोजगार मेळावा
२४ रोजी रत्नागिरीत
रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय मेळाव्याचे २४ रोजी सकाळी १० वाजता, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी येथे करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. नोंदणीकृत सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. तसेच नोंदणी केलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील युझर आयडी व पासवर्डच्या साह्याने ऑनलाईन अर्ज करुन मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरीता बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी नसल्यास कृपया त्या कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे, आवाहनही श्रीमती शेख यांनी केले आहे.
-----
संत रोहिदास महाराजांची
जयंती साजरी
रत्नागिरी : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्यावतीने जिल्हा कार्यालयात संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी संत रोहिदास महाराजांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन पूजन केले. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी डी. डी. केळकर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती मोरे, सुप्रिया पवार, जात पडताळणी विभाग तसेच महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.