rat16p19.jpg-
N45560
राजापूरः येथील महिला नागरी पतसंस्थेच्या पाचल शाखेचे उद्घाटन करताना शिल्पा मराठे, शंकर पाथरे, श्रृती ताम्हणकर, प्रतिभा रेडीज, किशोर नारकर, प्रसन्न मालपेकर, प्रेरणा अमरे आदी.
महिलांनी महिलांसाठी चालवलेली पतसंस्था
शंकर पाथरे; राजापूर महिला पतसंस्थेची तिसरी शाखा पाचलमध्ये
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ : राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेची ओळख ही महिलांनी महिलांसाठी चालवलेली पतसंस्था म्हणून आहे. ही आदर्श देणारी पतसंस्था आहे. महिलांना आर्थिक सक्षमतेकडे नेण्यासाठी या पतसंस्थेचा लाभ होईल, असे प्रतिपादन पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर पाथरे यांनी केले.
पाचल येथे राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याचे उद्घाटन पतसंस्थेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालिका शिल्पा मराठे, शंकर पाथरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रुती ताम्हणकर, माजी उपसरपंच किशोर नारकर, ग्रामपंचायत सदस्य विनायक सप्रे, कासीम गडकरी, दत्ताराम गोरुले, अनिल गांगण, राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा अनामिका जाधव, संचालिका प्रतिभा रेडीज, पतसंस्थेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालिका शिल्पा मराठे, प्रसन्न मालपेकर, छत्रपती संभाजीराजे पतपेढीच्या सचिव पवार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका अरुणा शेवडे यांनी केले, तर संचालिका स्नेहा कुवेसकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर श्री. नारकर यांनी महिलांना आवश्यक असणारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा जाधव यांनी महिला पतसंस्थेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करून पाचल येथील संस्थेची तिसरी शाखा कार्यान्वित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या सभासद माधवी हर्डीकर यांनी संस्थेची प्रगती ही भूषणावह असल्याचे सांगितले. माजीमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पतसंस्थेच्या तीन शाखांना परवानगी मिळाली होती. तर आमदार निरंजन डावखरे व ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून पतसंस्थेला संगणक संच मिळाला. माझ्याकडून जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करू असे सौ. मराठे यांनी सांगितले. संस्थाध्यक्षा सौ. ताम्हणकर यांनी पाचल पंचक्रोशीतील महिलांना कर्ज योजना व ठेवी योजनांचा लाभ घेता येणार आहे. संस्थेने महाकाली ठेव योजनेवर ९ टक्के व्याजदर देवू केलेला असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.