कोकण

बलस्थाने ओळखून यशाकडे वाटचाल करा

CD

बलस्थाने ओळखून यशाकडे वाटचाल करा
शेखरकुमार अहिरे ; राजापूर विद्यालयात पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ः विद्यार्थ्यांनी स्वतःची बलस्थाने, त्रुटी, क्षमता आणि अडथळे या सर्वांचा विचार करून यशाकडे वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी केले.
नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राजापूर येथे दहावीचा निरोप समारंभ आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्वॉट या संकल्पनेबद्दल माहिती दिली. राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुलतान ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कायर्क्रमावेळी अहिरे यांच्यासह संस्था सदस्य अबूबकर डोसानी, नझीर टोले, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. त्यानंतर नववीच्या विद्यार्थिनींनी हमद आणि अलविदा गीत सादर केले. तसेच विद्यार्थीनींनी मनोगतात शिक्षकांचे असणारे महत्त्व आणि आपल्या आठवणी सांगितल्या. प्रा. जैद बागबान यांनी विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले. तसेच प्रशालेचे प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परीक्षेच्या वेळेला कोणती काळजी घ्यावी, अभ्यास कसा करावा व यशस्वी कसे व्हावे याबाबतीत मार्गदर्शन केले. यावेळी राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. ठाकूर आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिला. सूत्रसंचालन आशना होलसेकर आणि खलील खलिफे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT