rat16p12.jpg-
N45536
पावसः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनारी प्लास्टिक मुक्तीसाठी श्रमदान मोहीम कार्यक्रमांतर्गत किनाऱ्यावर स्वच्छता करताना शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ.
गणेशगुळे, गावखडी किनारे झाले चकाचक
प्लास्टिक मुक्तीसाठी श्रमदान ; ग्रामपंचायतींचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ः प्लास्टिक मुक्तीसाठी येथील गणेशगुळे व गावखडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समुद्रकिनाऱ्यावर श्रमदान मोहीमेद्वारे स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे भरतीच्यावेळी किनाऱ्यावर आलेला सगळा कचरा साफ केला गेला. त्यामुळे दोन्ही किनारे चकाचक झाले.
गणेशगुळे सरपंच श्रावणी रांगणकर, उपसरपंच प्रसाद तोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाच्या महिला, पोलीस पाटील, ग्रामसेवक आदी या मोहिमेत सहभागी झालेले होते. यावेळी किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक कचरा जमा केला आणि त्याची विल्हेवाटही लावण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच प्रसाद तोडणकर यांनी प्लास्टिक मुक्त श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले.
ते म्हणाले, प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. प्लास्टिक मुक्तीचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यात प्रत्येकाने मदत केली पाहिजे. तरच ही मोहीम यशस्वी होईल. सध्या पर्यटकांनी किनाऱ्यावर टाकलेले प्लास्टिक जमा करून त्याची विल्हेवाट या मोहिमेअंतर्गत लावली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिक मुक्तीचे महत्त्व पटावे यासाठी ही मोहीम महत्वाची आहे.
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्यावतीने सरपंच गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी बचत गटातील महिला, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या. ही मोहिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार हाती घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.