कोकण

रत्नागिरी- विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ

CD

rat16p18.jpg-
45559
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित आशीर्वाद समारंभात बोलताना मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर.

पटवर्धन हायस्कूलमध्ये दहावीच्या
विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ उत्साहात झाला. गुरुकृपा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर आणि प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे पदाधिकारी श्रीराम भावे आणि माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे उपस्थित होते.
इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी वेदांग कुलापकर, पूर्वा माईणकर, सूर्याक्ष रेमणे, गायत्री किनरे, चिन्मय वाडकर, श्लोक सुर्वे आणि रिया जोशी यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी माजी उपमुख्याध्यापक वसंत आर्डे यांनी परीक्षेसंदर्भात सूचना दिल्या. शिक्षिका प्राजक्ता शिरधनकर, अजित मुळीक, सुनिता गाडगीळ आणि कैलास वाडकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना व परीक्षा लेखनासंदर्भातील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. सुर्वे, गुरुकुल प्रबंधक मनाली नाईक, माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात जानकी घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन हेमलता गुरव यांनी केले. अमर लवंदे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT