कोकण

रत्नागिरी : दहावीच्या परीक्षेचे काटेकोर संचलन करा अन्यथा कारवाई

CD

दहावी परीक्षेचे काटेकोर नियोजन करा, अन्यथा कारवाई
राजेश क्षीरसागर; कोकण मंडळात २७ हजार ८४१ परीक्षार्थी, गैरमार्ग यादीत एकही केंद्र नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : येत्या २१ फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षेला सुरवात होणार आहे. या परीक्षा संचलनात हयगय केल्यास कडक कारवाईचा इशारा विभागीय मंडळाने क्षेत्रीय यंत्रणांसहित शाळांना दिला आहे. कडक नियोजनामुळे बारावीच्या परीक्षेमध्ये नियोजनाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षा सुद्धा चांगल्या वातावरणात पूर्ण होण्यासाठी जिल्हा, तालुका, परिरक्षण केंद्र, परीक्षा केंद्र व शाळा स्तरावरील नियोजन काटेकोरपणे पूर्ण करणे आवश्यक आहे, अशा सूचना कोल्हापूर व कोकण विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.
कोकण विभागीय मंडळांतर्गत २७ हजार ८४१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार असून ११४ केंद्रावर दहावीची परीक्षा होणार आहे. गैरमार्ग यादीत एकही केंद्र नसल्याने कोकणात दहावीच्या कोणत्याही केंद्रावरील कर्मचारी वर्ग बदलण्यात येणार नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत एकनाथ आंबोकर कोल्हापूर, सुवर्णा सावंत, रत्नागिरी, कविता शिंपी सिंधुदुर्ग यांनी बारावी परीक्षेतील सद्यस्थिती आणि दहावी परीक्षेची पूर्वतयारी याचा आढावा सादर केला.
विभागीय अध्यक्ष क्षीरसागर, सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी. एम. किल्लेदार, कोकण विभागीय सहसचिव दीपक पोवार यांनी विभागीय मंडळ कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली. परीक्षा आयोजनामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये आणि गैरप्रकार मुक्त परीक्षा होण्यासाठी ही बैठक घेतल्याचे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांमध्ये कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा आयोजन करण्याचे निर्देश दिले असल्याचे विभागीय अध्यक्ष क्षीरसागर यांनी सांगितले. दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी भरारी पथक व बैठे पथकाचे उत्तम नियोजन केले आहे.
विभागीय मंडळांने प्राचार्य डायट, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना, गटशिक्षणाधिकारी, परिरक्षक, केंद्र संचालक आणि माध्यमिक- उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची ऑनलाइन पद्धतीने दहावी परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मागील डिसेंबरपासूनच जिल्हास्तरावर शाळा प्रमुखांच्या बैठका, भौतिक सुविधांची पाहणी, गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासाठी कॉपीमुक्तीची शपथ, शाळा स्तरावर पालक बैठकांचे आयोजन, परीक्षेला सामोरे जाताना-विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन उदबोधन कार्यक्रम व व्हिडिओ निर्मिती असे हटके उपक्रम करतानाच राज्य मंडळाच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यात शाळास्तरावर जनजागृती सप्ताह आयोजित केला. क्षेत्रीय यंत्रणांसह शाळा प्रमुखांच्या पाठपुरावा बैठकाही घेतल्या. त्यातच राज्यस्तरावरून मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाला या परीक्षांमध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले असल्याने चालू वर्षाच्या बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू आहेत.
बारावी परीक्षेच्या धर्तीवर दहावी परीक्षेलाही पाचही जिल्ह्यात संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. भरारी पथक आणि बैठ्या पथकांनाही सक्त निर्देश देण्यात आले आहेत. बारावी परीक्षेपूर्वी कोल्हापूर येथील एका शाळेत प्रवेशपत्रे आणि आवेदन पत्राबाबत झालेल्या गोंधळावरून सर्वच शाळांना आवश्यक पूर्वतयारीच्या सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच गैरप्रकारास उत्तेजन देणाऱ्या, मदत करणाऱ्या आणि सामील असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
------

चौकट १

रत्नागिरी जिल्हा आकडेवारी
* परीक्षार्थी- १८,८३४
* परिरक्षण केंद्रे- १३
* परीक्षा केंद्रे- ७३
* परीक्षार्थी प्रविष्ट करणाऱ्या शाळांची संख्या ४३४

--------

कोट
क्षेत्रीय अधिकारी व शाळांना परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या असून कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी.
- राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT